महालक्ष्मी आरती (Mahalaxmi Aarti) Marathi

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

महालक्ष्मी आरती - Mahalaxmi Aarti Marathi

महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत. प्रतिवर्षीच्या नवरात्रोत्सवात या मंदिरांमध्ये विशेष धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. ‘अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. पैकी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची आरती खास आपल्यासाठी…

महालक्ष्मी आरती – Mahalaxmi Aarti

नवरात्रोत्सव : दुर्गा देवीच्या सर्व नऊ स्वरुपांची माहिती, महती व महत्त्व

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥

करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता
कमलाकरे‍ जठरी जन्मविला धाता
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री निजबीजा निगमागम सारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥

अमृत भरिते सरिते अघदुरितें वारीं
मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं
वारी मायापटल प्रणमत परिवारी
हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

Download the (महालक्ष्मी आरती) Mahalaxmi Aarti  PDF using the link given below.

2nd Page of महालक्ष्मी आरती (Mahalaxmi Aarti) PDF
महालक्ष्मी आरती (Mahalaxmi Aarti)
PDF's Related to महालक्ष्मी आरती (Mahalaxmi Aarti)

महालक्ष्मी आरती (Mahalaxmi Aarti) PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of महालक्ष्मी आरती (Mahalaxmi Aarti) PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES