कृष्णाच्या जन्माची कहाणी (Shri Krishan Janmashtami Katha) Marathi PDF

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

कृष्णाच्या जन्माची कहाणी (Shri Krishan Janmashtami Katha) Marathi

कृष्णजन्मकथेला देखील एक मतितार्थ आहे. देवकी मानवी देहाचे प्रतीक आहे तर वासुदेव प्राणशक्तीचे प्रतीक आहे. मानवी देहामध्ये जेंव्हा प्राणशक्ती वृद्धिंगत होते तेंव्हा कृष्णाची म्हणजे आनंद ची अनुभूती प्राप्त होते.

कंस हा देवकीचा भाऊ, म्हणजे देवकीचा सहोदर, जो अहंकाराचे प्रतीक आहे. अहंकार मानवी देहासोबत येतो. होय नां ? अहंकार आनंदाच्या म्हणजे कंस कृष्णाच्या विनाशाचा प्रयत्न करतो. आनंदी व्यक्ती कोणालाही उपद्रव देऊच शकत नाही. दुःखी आणि भावनात्मक दुखावलेली व्यक्ती व्यत्यय निर्माण करत रहाते. ज्या व्यक्तींना, आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटते, अशा व्यक्ती त्यांच्या दुखावलेल्या अहंकारापोटी इतरांवर अन्याय करतात.

कृष्णाच्या जन्माची कहाणी (कृष्ण जन्माष्टमी) व्रत कथा मराठी / Shri Krishana Janmashtami Vrat Katha in Marathi

कृष्णजन्माच्या कथेचा देखील गहन अर्थ आहे. देवकी हे शरीराचे प्रतीक आहे तर वासुदेव हे जीवनऊर्जेचे (प्राण) प्रतीक आहे. शरीरात जसजसा प्राण वाढतो तसा आनंदाचा (कृष्ण) जन्म होतो. पण अहंकार (कंस) त्या आनंदाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कंस हा देवकीचा भाऊ आहे जो दर्शवितो की अहंकार हा शरीरासोबतच जन्माला येतो. जी व्यक्ती आनंदी आणि प्रसन्न असते ती दुसऱ्यासाठी कसलाही उपद्रव उत्पन्न करत नाही. जी व्यक्ती दुःखी आणि भावनिक स्तरावर क्लेशग्रस्त असते तीच फाटाफूट करण्यात धन्यता मानते. ज्यांना असे वाटते की आपल्यावर अन्याय झालाय ते आपल्या दुखावलेल्या अहंकारामुळे इतरांवर अन्याय करतात.

अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आनंद आहे. जेथे प्रेम आणि आनंद असतो तेथे अहंकार टिकत नाही आणि अहंकाराला त्यापुढे झुकावे लागते. एखादी व्यक्ती समाजात कितीही उच्चपदस्त असली तरी ती आपल्या छोट्या बाळासमोर पार विरघळून जाते. एखादी व्यक्ती कितीही कणखर असली तरी तिचे मुल जेंव्हा आजारी पडते तेंव्हा ती असहाय्य होतेच. अहंकार हा प्रेम, निरागसता आणि आनंद यांच्यापुढे विरघळतोच. कृष्ण म्हणजे आनंदाचे मूर्तिमंत रूप, निरागसतेचा सार आणि प्रेमाचा आत्यंतिक स्रोत होय.

कंसाने देवकी आणि वासुदेव यांना घडविलेला तुरुंगवास हे दर्शवितो की, जेंव्हा अहंकार प्रबळ होतो तेंव्हा शरीर तुरुंगासारखे वाटते. जेंव्हा कृष्णाचा जन्म झाला तेंव्हा तुरुंगाचे रक्षक झोपी गेले होते. येथे आपली ज्ञानेंद्रिये हीच रक्षक आहेत जे अहंकाराला जोपासतात. कारण ते जेंव्हा जागे असतात तेंव्हा त्यांचे ध्यान बाह्यजगताकडे वळलेले असते. जेंव्हा ती ज्ञानेंद्रिये अंतर्मुख होतात तेंव्हा आपल्या अंतरंगातील आनंद बहरू लागतो.

कृष्णाला ‘माखनचोर’ म्हणूनही ओळखतात. दूध हे पोषकद्रव्यांचे सार आहे आणि दही हे दुधाचेच रूप आहे. दही घुसळल्यावर त्यातून लोणी बाहेर येते आणि वर तरंगू लागते. हे पौष्टिक असते आणि हलकेफुलके असते, जड नसते. त्याचप्रमाणे जेंव्हा आपली बुद्धी घुसळली जाते तेंव्हा ती लोण्यासारखी होते. जेंव्हा मनात ज्ञानाचा उदय होतो तेंव्हा ती व्यक्ती आपल्या अंतरात्म्यात स्थित होते. अशी व्यक्ती ह्या जगतापासून अनासक्त असते आणि त्या व्यक्तीचे मन संसारात गुंतून राहत नाही. कृष्णाचे लोणी चोरणे हे प्रेमाचा महिमा दर्शविणारे प्रतीक आहे. कृष्णाची मोहिनी आणि कुशलता इतकी आकर्षक आहे की तो आत्यंतिक वैराग्यपूर्ण व्यक्तीचेही मन चोरतो.

कृष्णाच्या डोक्यावर मोरपीस कां आहे? एक राजा आपल्या संपूर्ण प्रजेसाठी जबाबदार असतो आणि ती जबाबदारी ओझे बनू शकते जी त्याच्या डोक्यावर मुकुटाच्या रुपात असते. पण कृष्ण आपली जबाबदारी एखाद्या खेळाप्रमाणे सहजतेने, लीलया पार पाडतो. आईला आपल्या मुलांची काळजी घेणे हे कधीच ओझे वाटत नसते. त्याचप्रमाणे कृष्ण आपली जबाबदारी सहजतेने पार पाडतो आणि आपल्या भूमिका त्याच्या मुकुटावरील मोरपिसा सारख्या विविध रंगाने वठवतो.

कृष्ण हे आपल्या सर्वांच्या अंतरंगातील सर्वात मोहक, आनंदमय असे तत्व आहे. जेंव्हा मनात कसलीही बेचैनी, चिंता किंवा आकांक्षा नसते तेंव्हाच तुम्ही गहन विश्रांती घेऊ शकता. आणि अशा गहिऱ्या विश्रांतीतच कृष्णाचा जन्म होतो.

कृष्णजन्माचा संदेश हाच आहे की समाजात आनंद-लहरी आणण्याची हीच वेळ आहे. खरेच… आनंदी होणे “गांभीर्याने” घ्या.

जन्माष्टमीचे व्रत कसे करावे :

  • जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा.
  • यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी.
  • यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा.
  • श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे.
  • गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.
  • जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा.
  • याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता.
  • श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. या दिवशी महाराष्ट्रात गोपाळकाल्याच्या निमीत्ताने दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या परंपरेने जन्माष्टमी साजरी केली जाते.

मराठीतील श्री कृष्णा आरती गीत (Shri Krishna Aarti Lyrics in Marathi) :

॥ श्री कृष्णाची आरती ॥

ओवालू आरती मदनगोपाळा।

श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥

चरणकमल ज्याचे अति सुकुमार।

ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान।

ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी।

वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान।

तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

एका जनार्दनी देखियले रूप।

रूप पाहों जाता झालेसें तद्रूप॥

ओवालू आरती मदनगोपाळा…॥

You can download the Shri Krishan Janmashtami Vrat Katha Marathi PDF by going through the following download button.

2nd Page of कृष्णाच्या जन्माची कहाणी (Shri Krishan Janmashtami Katha) PDF
कृष्णाच्या जन्माची कहाणी (Shri Krishan Janmashtami Katha)
RELATED PDF FILES

कृष्णाच्या जन्माची कहाणी (Shri Krishan Janmashtami Katha) PDF Download Free

REPORT THISIf the purchase / download link of कृष्णाच्या जन्माची कहाणी (Shri Krishan Janmashtami Katha) PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.