Pune City Police Bharti 2023 Merit List PDF
Pune City Police Bharti 2023 Merit List PDF Download for free using the direct download link given at the bottom of this article.
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदाच्या मैदानी चाचणी मध्ये ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात सामाजीक / समांतर प्रवर्ग / आरक्षणनिहाय वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या एकूण ८७० उमेदवारांचे वेळापत्रक व दिनांकनिहाय यादी खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी सदर यादीमध्ये नमूद उमेदवारांनी त्यांच्या नांवासमोर दर्शविलेल्या दिनांकास खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सकाळी ०५.३० वाजता सी.ओ.ई.पी. टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, शिवाजीनगर, पुणे- ४११००५ या ठिकाणी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीकरीता बिनचुक उपस्थित रहावे.
उमेदवारांनी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी येताना शारीरिक चाचणीकरिता महा-आयटीकडून निर्गमित झालेल्या ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रत. वाहन चालविण्याचा मुळ परवाना तसेच आधार कार्ड किंवा अन्य कोणतेही शासकीय ओळखपत्र व ४ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे. सदरची कागदपत्रे न आणल्यास वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीकरीता प्रवेश दिला जाणार नाही.
Pune City Police Bharti 2023 Merit List PDF
वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी २ प्रकारची जसे अ) हलके वाहन चालविण्याची चाचणी-२५ गुण आणि ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी-२ गुण अशी एकूण ५० गुणांची घेण्यात येणार असून उमेदवारांना सदर चाचणीमध्ये ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जे उमेदवार ४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतील ते उमेदवार लेखी परीक्षेकरीता पात्र ठरतील. तसेच कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता पापणी असून सदर चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.
You can download the Pune City Police Bharti 2023 Merit List PDF using the link given below.
