यमुनापर्यटन कादंबरी (Yamuna Paryatan Kadambari) Marathi PDF

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

Yamuna Paryatan Kadambari Marathi

मराठी वाङमयेतिहासातील गेल्या 150 वर्षांतील महत्त्वाच्या पुस्तकांच्या यादीत `यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरुपण’ या बाबा पदमनजी यांच्या छोटेखानी पुस्तकाचा अग्रक्रमाने समावेश करावा लागेल. सन 1857 मध्ये ही कादंबरी प्रथम प्रकाशित झाली. अलीकडे (2005 मध्ये) तिची नवी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. वाङमयेतिहासात जरी या पुस्तकाला मराठी कादंबरीचा प्रारंभबिंदू मानले जात असले तरी, ते कादंबरी स्वरूपाचे लेखन मानता येईल किंवा कसे हा मुद्दा विवाद्य ठरला आहे.

या कादंबरीत प्रतिबिंबित झालेला वास्तववाद एका बाजूने उघडा-बोडका, तर दुसर्या बाजूने प्रचारपीडित आहे. कारण विधवाची दुःखे उघड करणे किंवा विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणे हे निमित्त घेऊन ख्रिस्ती धर्माची महती येनकेन प्रकारेण त्यात पटविली आहे. तसे करताना त्यात अतिरंजितपणा व भडकपणा शिरला आहे. यातील विषयाचा वर्तमान-संदर्भ (रेलेव्हन्स) आता उरलेला नाही. तरीही 150 वर्षांपूर्वीच्या विद्यमान स्थितीवर इतके परखड भाष्य करणे हे पदमनजींचे धाडस विस्मित करणारे होते असे निश्चितपणे म्हणता येईल. बाबांना हिंदुधर्मातील तत्त्वांचाही दाट परिचय असला पाहिजे हे स्पष्टपणे दिसून येते. या कादंबरीची भाषा तत्कालीन प्रौढभाषेचा नमुना म्हणून लक्षात घेण्यासारखी आहे. ती सहज, साधी आहे. म्हणींचा वापरही त्यांनी यथोचितपणे नि विपुल केला आहे.

Yamuna Paryatan Kadambari Chapter 2

Yamuna Paryatan Kadambari

(यमुनापर्यटन कादंबरी) Yamuna Paryatan Kadambari PDF download using the link given below.

2nd Page of यमुनापर्यटन कादंबरी (Yamuna Paryatan Kadambari) PDF
यमुनापर्यटन कादंबरी (Yamuna Paryatan Kadambari)

यमुनापर्यटन कादंबरी (Yamuna Paryatan Kadambari) PDF Download Free

REPORT THISIf the purchase / download link of यमुनापर्यटन कादंबरी (Yamuna Paryatan Kadambari) PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

One thought on “यमुनापर्यटन कादंबरी (Yamuna Paryatan Kadambari)

Comments are closed.