गणरायाची आरती सुखकर्ता दुखहर्ता (Ganpati Aarti) Marathi PDF
भाद्रपद महिना सुरू झाला की, वेध लागतात ते गणपती आगमनाचे. उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात गणपतीची अगदी विधिवत पूजा केली जाते.
प्रत्येक जण आपापल्या परिने गणपतीचे नामस्मरण, उपासना, आराधना करत असतो. पार्थिव सिद्धिविनायक पूजन झाल्यानंतर आपल्याकडे आरत्या म्हणायची परंपरा आहे. शास्त्रांनुसार, सकाळी ९ वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी प्रदोष काळानंतर आरती करावी, असे सांगितले जाते.
गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता Lyrics / Ganpati Aarti Marathi
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥
Ganesh Arti Hindi
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
माता जाकी पार्वती पिता महादेवा ॥ जय…
एक दंत दयावंत चार भुजा धारी।
माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी ॥ जय…
अंधन को आंख देत, कोढ़िन को काया।
बांझन को पुत्र देत, निर्धन को माया ॥ जय…
पान चढ़े फल चढ़े और चढ़े मेवा।
लड्डुअन का भोग लगे संत करें सेवा ॥ जय…
दीनन की लाज रखो, शंभु सुतकारी।
कामना को पूर्ण करो जाऊं बलिहारी॥ जय…
‘सूर’ श्याम शरण आए सफल कीजे सेवा
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा ॥ जय…
Download the Jai Ganesh Arti in PDF format online from the link given below.
Also check – गणेश आरती हिन्दी में
