All Disease Name List Marathi Marathi PDF

All Disease Name List Marathi in Marathi PDF download free from the direct link below.

All Disease Name List Marathi - Summary

एक रोग ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीराला किंवा संरचनेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होते. हे आजार (रोग) विविध प्रकारचे असतात. संक्रमणामुळे होणारे रोग, रोगजनकांमुळे होणारे रोग, सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग आणि संक्रमणामुळे होणारे रोग अशी रोगांची विभागणी केली जाते.

रोग व रोगांचे प्रकार या लेखात आपणास संक्रामक आणि प्रसारानुसार रोगाचे प्रकार व रोगाचे कारक याबद्दल माहिती मिळणार आहे. रोग व रोगांचे प्रकार या लेखाचा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.संक्रामक रोगांचे तीन प्रमुख  प्रकार पडतात. त्यांची नावे व व्याख्या खालीलप्रमाणे आहे.

संक्रामक रोग (Infectious diseases)

  • संसर्गजन्य रोग (Communicable Diseases)
  • संपर्कज्यन्य रोग (Contagious Diseases)
  • साथीचे रोग

(All Disease Name List Marathi) विषाणूजन्य रोग

विषाणूजन्य रोग
रोगाचे नाव  कारक विषाणू
इन्फ्लुएंझा(Influenza) मायक्सोव्हायरस ए, बी, सी(Myxovirus A, B, C)
स्मॉल  पॉक्स(Small Pox) व्हेरिओला विषाणू(Variola virus)
कांजिण्या(Chicken pox) व्हेरिसेला झोस्टर(Varicella Zoster)
गोवर(Measles) पॅरामीक्सोव्हायरस(Paramyxovirus)
जर्मन गोवर (रुबेला)(German Measles (Rubella)) रुबेला विषाणू(Rubella virus)
रेबीज(Rabies) रेबीज विषाणू(Rabies Virus)
गलगंड(Mumps) पॅरामीक्सो व्हायरस(Paramyxo virus)
ट्रेकोमा(Trachoma) क्लॅमिडीया ट्रॅकोमाटिस(Chlamydia trachomatis)
पोलिओमायलायटीस(Poliomyelitis) पोलिओव्हायरस (पिकोर्ना व्हायरस)(Poliovirus (Picorna virus))
पीतज्वर(Yellow fever) आर्बो व्हायरस(Arbo virus)
एड्स(AIDS) एचआयव्ही(HIV)
हिपॅटायटीस(Hepatitis) HAV, HVB, HCV HDV, HEV
डेंग्यू ताप(Dengue fever) DEN₁, DEN₂, DEN₃, DEN₄
डिप्थीरिया(Diphtheria) कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थीरिया(Cornebacterium diphtheriae)

जीवाणूजन्य रोग

जीवाणूजन्य रोग
रोगाचे नाव  कारक जीवाणू
क्षयरोग(Tuberculosis) मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस(Mycobacterium tuberculosis)
डांग्या खोकला (पर्टुसिस)(Whooping cough(pertussis)) बोर्डेटेला पेर्टुसिस(Bordetella pertusis)
गोनोरिया(Gonorrhea) निसेरिया गोनोरियाNeisseria gonorrhea
उपदंश(Syphilis) ट्रेपोनेमा पॅलिडम(Treponema pallidum)
धनुर्वात(Tetanus) क्लोस्ट्रीडियम टेटानी(Clostridium tetani)
कॉलरा(Cholera) व्हिब्रियो कोमा, व्ही. कॉलरा(Vibrio coma, V. Cholera)
विषमज्वर(Typhoid) साल्मोनेला टायफी किंवा एस टायफोसा(Salmonella typhi or S. typhosa)
न्यूमोनिया(Pneumonia) डिप्लोकोकस न्यूमोनिया(Diplococcus Pneumonia)
प्लेग(Plague) येर्सिनिया पेस्टिस किंवा पाश्चुरेला पेस्टिस(Yersinia pestis or Pasteurella pestis)
कुष्ठरोग (हेन्सेन रोग)(Leprosy (Hensen’s disease)) मायकोबॅक्टेरियम लेप्रेल(Mycobacterium leprale)

प्रोटोझोअन्स रोग

प्रोटोझोअन्स रोग
रोगाचे नाव  कारक प्रोटोझोअन्स
मलेरिया(Malaria) प्लास्मोडियम विवाक्स(Plasmodium vivax)
अमीबियासिस(Amoebiasis) एंटामोएबा हिस्टोलिटिका(Entamoeba histolytica)
ट्रायपॅनोसोमियासिस (झोपेचा आजार)(Trypanosomiasis (Sleeping sickness)) ट्रायपॅनोसोमा एसपी.(Trypanosoma sp.)

कीटक वाहून नेणारे रोग

कीटक वाहून नेणारे रोग
डास (एनोफिलीस)(Mosquito (Anopheles)) मलेरिया(Malaria)
एडीस इजिप्ती(Aedes aegypti) डेंग्यू ताप(Dengue fever)
उंदीर, पिसू(Rat. flea) प्लेग(Plague)
क्युलेक्स(Calex) फायलेरियासिस किंवा हत्तीरोग(Filariasis or elephantiasis)
घर माशी(House fly) कॉलरा(Cholera)

RELATED PDF FILES

All Disease Name List Marathi Marathi PDF Download