ए पी जे अब्दुल कलाम जीवन परिचय मराठी - Summary
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे खूप महान व्यक्ती होते. ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी ”अग्नी” मिसाईल चे उडाण करून आपल्या देशाची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली होती. याच करणामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. अब्दुल कलाम हे खूप दूरदृष्टीचा विचार करणारे महान वैज्ञानिक होते, तसेच त्यांचे व्यक्तिमत्व खूपच महान होत.
अब्दुल कलाम हे महान व्यक्तिमत्व असणारे एक प्रभावशाली वक्ता होते. तसेच ते प्रमाणिक आणि कुशल राजनितिज्ञ सुद्धा होते. त्याच्याकडून सर्वांनाच प्रेरणा मिळते, कारण त्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला आहे. आलेल्या परिस्थितीशी सामना करून त्यांनी आपल्या आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठले आहे. आजसुद्धा त्यांचे प्रेरणादायी विचार लाखो युवकांना आयुष्यात समोर जाण्यासाठी त्या युवकांच्या मनात एक ऊर्जा आणि जिद्द निर्माण करतात. चला तर जाणून घेऊया भारताच्या या महामहीम व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाशी जोडल्या असलेल्या काही विशेष गोष्टी।
ए पी जे अब्दुल कलाम जीवन परिचय मराठी
वास्तविक नाव (Real Name) | अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम |
जन्मतिथी (Birthday) | १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर, तमिळनाडू, ब्रिटीश भारत |
वडिलांचे नाव (Father Name) | जैनुलाब्दिन मारकयार |
आईचे नाव (Mother Name) | आशिमा जैनुलाब्दिन |
विवाह (Wife Name) | अविवाहित |
शैक्षणिक योग्यता (Education) | १९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून,एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून
भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली. |
मृत्यू तिथी(Death) | २७ जुलै २०१५, शिलांग, मेघालय, भारत.- |
अब्दुल कलाम यांनी शिक्षणासाठी केलेले संघर्ष – APJ Abdul Kalam Education
अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वर शहरातील धुनषकोड़ी गावी एका गरीब कुटुंबात झाला असल्याने त्यांना आपल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. कलाम आपले शालेय शिक्षण घेत असतांना पेपर वाटायचे काम करीत असत, आणि त्यातून मिळणाऱ्या पैस्यातून ते त्यांचा शालेय खर्च भागवत असत.
कलाम यांनी त्यांचे सुरवातीचे शालेय शिक्षण रामनाथपुरम स्च्वार्त्ज़ मैट्रिकुलेशन शाळेत पूर्ण केले. यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण १९५० साली तामिळनाडूतील तीरुचीरापिल्ली येथे असणाऱ्या सेंट जोसेफ्स महाविद्यालया मधून भौतीकशास्त्र विषयाची पदवी घेतली. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम यांनी १९५४ ते १९५७ च्या कालावधी दरम्यान मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून एरोनॉटिकल इंजिनियरींग मध्ये डिप्लोमा केला होता.
अश्या प्रकारे त्यांनी कठिण परिस्थिती असतांना देखील आपले शिक्षण घेणे सुरूच ठेऊन काही कालावधी नंतर, अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिक च्या रुपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून दिली. अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वात सर्वोच्च पद असणारे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते.
ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीच सबंध नव्हता. अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (डीआरडीओ) मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरु करून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती.
अब्दुल कलाम यांची विचारर्श्रेणी खूपच दूरवरची असल्याने ते नेहमीच काही तरी नविन आणि मोठ करण्याचे उद्देश्य आपल्या मनाशी बाळगत असत. त्यांनी आपल्या वैज्ञानिक्तेच्या कारगीर्दीत सुरवातीलाचा एका छोट्याशा हेलिकॉप्टर चे डिजाईन तयार करून लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटून दिला होता. “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” (DRDO) येथे काही काळ नौकरी केल्यानंतर ते “इंडियन कमेटी फॉर स्पेस रिसर्च” चे सदस्य सुद्धा राहिले होते. यानंतर १९६२ मध्ये ते भारताचे महत्वपूर्ण संगठन असलेल्या “भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संगठन” (ISRO) सोबत जुळले होते. १९६२ पासून १९८२ च्या कालावधी पर्यंत ते इस्रो सोबत जुळलेले होते, या दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची पडे सांभाळली होती. अब्दुल कलाम यांना भारताच्या सेटैलाइट लॉन्च व्हीकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती.
कलाम हे त्याठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टर च्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी भारतात आपले पहिले “स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV3” तयार केले होते. यानंतर या यानाला १९८० मध्ये पृथ्वीच्या कक्षे जवळ स्थानापन केले होते.
नीचे दिए गए लिंक पर क्लिक करके आप ए पी जे अब्दुल कलाम जीवन परिचय मराठी PDF मुफ्त में डाउनलोड कर सकते हैं।