Stories in Marathi (100+ मराठी कथा) Marathi PDF

Stories in Marathi (100+ मराठी कथा) in Marathi PDF download free from the direct link below.

Stories in Marathi (100+ मराठी कथा) - Summary

Download the Marathi Story PDF from the link provided at the bottom of this page. Moral stories are essential as they help in building ethics and values that nurture the spirit of righteousness in children. These stories teach kids the importance of staying grounded and not drifting away from the right path due to temptations like greed, envy, or pride. 🌟

Why Read Marathi Stories?

आम्हाला माहित आहे तुम्ही सगड्यांना छान छान गोष्टी खूप अवाढतात. खाली तुम्हा सगड्यां साठी काही लहान मुलांच्या गोष्टी (Marathi Stories For Kids With Moral) लिहिल्या आहे. तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडेल.

मराठी कथा का संग्रह (Moral Story)

उंदराची टोपी – Undarachi Topi

एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके. फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा, धोबीदादा माझे फडके धुवून दे.’ धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, शिंपीदादा, मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव.’ शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.

उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम, ढुम, ढुमक!’ राजाने हे ऐकले. तो शिपायांना म्हणाला ‘जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’ शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम, ढुम, ढुमक!’

हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम, ढुम, ढुमक!’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक – Chal Re Bhoplya Tunuk Tunuk

एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसऱ्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो.’ पण म्हातारी हुषार होती.

ती म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते, तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.’ कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो.’ त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते, तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.’ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे गेली.

Moral Marathi Story

नंदूने एक मोठी उडी मारली आणि तो त्या खडकावर पोचला. मग तिथून आणखी एक उडी मारली आणि तो थेट बेटावरच पोचला. खरं तर हे फारच धोक्याचं होत पण नंदू काही कमी धाडसी नव्हता. नंदंन बेटावरचे मनसोक्त आंबे खाल्ले आणि मजेत फिरून झाल्यावर खडकावर परत एकदा उडी मारून गेला होता तसाच तो परत घरी आला. त्यान आपल्या आई-बाबांना या बेटाबद्दल सांगितले.

आपल्या मित्रांना तर त्यानं आपल्याबरोबर बेटावर यायचं आमंत्रण देखील दिलं. “बेट फार दूर आहे. आम्ही नाही येणार” असं म्हणून मित्र त्याच्याबरोबर यायला तयार नव्हते. भूक लागली की नंद एकटाच बेटावर जायचा. पावसाचे दिवस होते. नदीचं पाणी बरच वाढलं होत, नदीतला खडक बराच पाण्याखाली गेला होता.

एक दिवस नंद बेटावरुन परत यायला निघाला तेव्हा खडकाचा अगदी थोडासाच भाग दिसत होता. नंदू काळजीपूर्वक खडकावर उडी मारण्याच्या बेतातच होता पण तो एकदम थांबला. “असं कसं झालं? खडक तर आता पहिल्यापेक्षा अचानक मोठा कसा काय झाला? यात नक्कीच काहीतरी धोका असणार.” थोडा विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली.

नंदूनं मोठ्यानं विचारलं, “खडक्दादा, तू ठीक आहेस ना?” पण काहीच उत्तर आलं नाही. नंदून परत मोठ्यानं विचारलं, “आज तू बोलत का नाहीस?” खडकावर झोपलेल्या मगरीला वाटलं. हा खडक बहुधा रोज या माकडाशी बोलत असेल. “अरे दादा, तू काय म्हणत होतास?” मगरीन विचारलं. तिचं डोकं आणि शेपूट पाण्यात लपलेले होते. नंदूला मगरीची युक्ती समजली.

तो म्हणाला, “तू मगर आहेस ना? तुला काय हवंय?” मगरीनं रागावूनच उत्तर दिलं, “मी तुला खाणार आहे.” नंदू विचारात पडला, ‘आता या मगरीपासून सुटका कशी करून घ्यावी? मग त्याला एक उपाय सुचला. तो म्हणाला, “मगरताई, एवढंच ना? तू तुझं तोंड जितकं मोठं उघडता येईल, तितकं उघड. मी सरळ तुझ्या तोंडातच. उड़ी मारेन. पण तू डोळे मात्र अगदी घट्ट मिटून घे. माझी उडी जर चुकली, तर तुझ्या डोळ्यांना लागेल ना.” मूर्ख मगरीनं आपले डोळे पट्ट मिटून घेतले आणि तोंड उघडून वाट पाहू लागली. नंदून नीट लक्ष देऊन बरोबर मगरीच्या पाठीवर उडी मारली आणि दुसऱ्या उडीत पलीकडच्या किना-यावर पोचला.

जातक कथा

You can download the Marathi Story (100+ मराठी कथा) PDF using the link given below.

RELATED PDF FILES

Stories in Marathi (100+ मराठी कथा) Marathi PDF Download