Gram Panchayat Election 2024 Maharashtra List PDF

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

Gram Panchayat Election 2024 Maharashtra List

राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे.

सरपंचांची यादी सर्वात आधी; पाहा तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी  राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 5 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर आज मतमोजणी सुरु झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Gram Panchayat Elections Result 2023

  1. राज्यातला पहिला सरपंच ठाकरे गटाचा, कोल्हापुरातील राधानगरी चांदेकरवाडीत लोकनियुक्त सरपंच सौ .सीमा हिंदुराव खोत विजयी
  2. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीचा निकाल हाती, भाजप समर्थक आघाडीचे संपूर्ण पॅनल विजयी, सरपंच अंबिका दशरथ कोळी विजयी
  3. करमाळा तालुक्यातील गोंडारे, रामवाडी या दोन ठिकाणी आ संजय मामा शिंदे गटाचे सरपंच विजयी
  4. कोल्हापुरातील राधानगरी तालुका न्यू करंजेत लोकनियुक्त सरपंच सद्दाम शिराज तांबोळी विजयी
  5. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील फराळे लोकनियुक्त सरपंचपद सतेज पाटील गटाकडे सौ सीमा संदीप डवर विजयी
  6. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींना पहिला झटका, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी ग्रामपंचायतीत काँग्रेस पॅनल विजयी, 7-2 ने काँग्रेसच्या बाजूनं निकाल, महेश पाटील विजयी
  7. कोल्हापुरात बारडवाडीत लोकनियुक्त सरपंच वसंत पांडुरंग बारड विजयी
  8. सोलापुरात ठाकरे गटानं उघडलं खातं अक्कलकोट तालुक्यातील केगांव बुद्रुकची सत्ता ठाकरे गटाकडे, श्रीशैल आहेरवाडी विजयी
  9. नाशिक जिल्ह्यातील 48 पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध, पिंपळगाव गरुडेश्वर ग्रामपंचायतीत बाळू वाळू डंबाळे (शरद पवार गट) विजयी, तर बागलाण तालुक्यातील भवाडे ग्रामपंचायतीत अनिल तुळशीराम मोरे विजयी, तसेच, इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ग्रामपंचायतीत अनिता राक्षे (ठाकरे गट) विजयी
  10. सोलापुरातील करमाळा तालुक्यात वीट ग्रामपंचायतीत सुरज गणगे (राष्ट्रवादी : अजित पवार गट) विजयी
  11. सोलापुरातील करमाळा तालुक्यात केत्तूर ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीची सत्ता, सचिन वेळेकर (स्थानिक आघाडी) विजयी
  12. कोल्हापूर राधानगरी तालुक्यात फेजिवडेत लोकनियुक्त सरपंच सौ. प्रतिभा भरत कासार विजयी
  13. सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपने खाते खोललं, मिरज तालुक्यातील हरिपूर ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता कायम, खासदार संजय काका पाटील गटाचे अरविंद तांबवेकर यांची हरिपूर ग्रामपंचायतवर सत्ता कायम
  14. कोल्हापुरातील शिरोली दुमाला इथं गोकुळ माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे पुत्र सचिन पाटील यांचा विजयी, काँग्रेस पक्षाकडे आणखी एक ग्रामपंचायत
  15. बहुजन विकास आघाडीच्या प्रिया प्रकाश कामडी लाल ठाणे ग्रामपंचायतीवर सरपंच पदासाठी विजयी, लालठाणे ग्रामपंचायत बहुजन विकास आघाडीकडे
  16. कोल्हापुरातील राधानगरी पालकरवाडीत लोकनियुक्त सरपंच महेश नामदेवराव भोईटे (राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी
  17. कोल्हापुरातील कोदवडेत सदस्य सौ. मंगल धनाजी पाटील विजयी
  18. पालघरमधील उनभाट पंचायतमध्ये सरपंच पदासाठी ठाकरे गटाच्या संगीता पाठारे विजयी
  19. बुलढाणा तालुक्यातील घाटनंद्रा ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून गणेश भुसारी विजयी
  20. कोल्हापूरच्या चिंचवाडमध्ये सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांना नाकारलं, अपक्ष उमेदवार श्रद्धा पोतदार झाल्या सरपंच
  21. नंदुरबार शहादा तालुक्यातील जयनगर ग्रामपंचायतीवर भाजप सरपंच विजयी.
  22. नागपुरात नांदोरामध्ये अपक्ष प्रभाकर उईके विजयी
  23. जळगाव तालुक्यातील करंज गावात सरपंच समाधान सपकाळे विजयी
  24. नाशिक तालुक्यातील लाडची ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सदस्य विणूबाई कडाळे विजयी
  25. जळगाव तालुक्यातील लोणवाडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा, अनिता बाळू धाडी सरपंचपदी विजयी
  26. जळगाव तालुक्यातील करंजगाव – धानोरा ग्रामपंचायतीवर भाजप झेंडा, करंजगाव धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचे समाधान प्रभाकर सपकाळे सरपंचपदी विराजमान
  27. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील अधोरेवाडी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं खातं उघडलं, अजित लकडे जनतेतून सरपंचपदी विराजमान
  28. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे भाग्यश्री सुदाम नाळे विजयी
  29. शिंदखेडा तालुक्यातील मांडल ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या रमाबाई आखाडे विजयी
  30. नाशिकमधील ग्रामपंचायतीचा पहिला निकाल हाती, नाशिक तालुक्यातील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा, अपक्ष उमेदवार मनीषा फसाळे सरपंच पदावर विजयी
  31.  इगतपुरी तालुक्यातील पहिला निकाल हाती, ओंडली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा, सरपंचपदी प्रकाश वाळू खडके विजयी
  32. महाडमधील काचले ग्रामपंचायतमध्ये शिवसेना ( शिंदे गटाचा ) सरपंच
  33. पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटांन खात खोललं जलसार ग्रामपंचायत वरती शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार विजयी
  34. संगमनेर तालुक्यातील आश्वि खुर्द ग्रामपंचायतीत विखे गटाचा विजय, महसूलमंत्री विखे पाटील यांच्या स्विय्य सहाय्यकाच्या पत्नीचा विजय, अलका बापूसाहेब गायकवाड विजयी, यापूर्वी होती विखे गटाची सत्ता
  35. अहमदनगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतचा सरपंच पदाचा निकाल हाती, काँग्रेस गटाचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी
  36. नागपुरातील कामठी तालुक्यातील बाबुलखेडा भाजपकडे सरपंचपदी भाजपचे कदीर ईमाम छवारे विजयी
  37. रायगड जिल्ह्यातील रोहामधील खारी गावात अजित पवार गटाचे दत्तात्रय काळे हे सरपंचपदी विजयी
  38.  भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील हिवरा येथे भूपेंद्र नगफासे विजयी (अजित पवार गट राष्ट्रवादी)
  39. भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील बच्छेरा येथे उमाबाई मेश्राम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
  40. नाशकात सटाणा तालुक्यात चिराई ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता, सरपंचपदी शकुंतला पाटील विजयी
  41. नागपुरात कामठी तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतीत भाजप विजयी, सरपंचपदी भाजपच्या सुजाता सुरेश पाटील विजयी
  42. कामठी तालुका कवठा मध्ये भाजपची सत्ता, सरपंच पदी निलेश डफ्रे विजयी
  43. संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागलेल्या कासेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता, भाजपचे यशपाल वाडकर सरपंचपदी विराजमान
  44. इगतपुरी तालुक्यातील दुसरा निकाल हाती, दौडत ग्रामपंचायतीवर काँग्रेसची बाजी, सरपंच पदी पांडू मामा शिंदे विजयी
  45. आटपाडी तालुक्यातील  मासाळवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर, शिवसेना (शिंदे) आघाडीची सत्ता. विनायक मासाळ यांचे पॅनेल विजयी, राहुल मासाळ थेट सरपंचपदी विजयी
  46. आटपाडी तालुक्यातील विभूतवाडीत सत्तांतर भाजपाचे आमदार पडळकर गटाची सत्ता गेली. शिवसेना आणि सर्वपक्षीय आघाडीचे सूरज पाटील सरपंचपदी
  47. आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडीत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर गटाचे राजाराम निवृत्ती वाक्षे सरपंचपदी
  48. आटपाडी तालुक्यातील आंबेवाडीत भाजपाच्या विद्या रितेश पुजारी सरपंचपदी
  49. माळशिरसच्या कारुंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता, नंदा कैलास नामदास  विजयी
  50. मावळ तालुक्यातील डोने गावात भाजपची सत्ता, डोने गावात भाजपचे हृषीकेश खारेक सरपंच
  51. दिवड गावात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कौल, दिवड गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश राजीवडे सरपंच झाले
  52. जळगावात चाळीसगाव तालुक्यात भाजपनं खातं उघडलंलं, माळशेवगे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा,  सरपंचपदी सुरेश पाटील विजयी
  53. इगतपुरी तालुक्यातील तिसरा निकाल हाती, कृष्णनगर ग्रामपंचायतीवर सरपंच पदी अपक्ष उमेदवार वैशाली सचिन आंबावने विजयी
  54. संगमनेर तालुक्यातील आश्वि बुद्रुक ग्रामपंचायतीत थोरात गटाचा विजय, नामदेव किसन शिंदे सरपंचपदी विजयी
  55. नागपुरात कामठी तालुक्यातील उमरीमध्ये काँग्रेसची सत्ता, सरपंचपदी काँग्रेसचे पवन पुरूषोत्तम सय्याम विजयी
  56. पुण्यातील खेड तालुक्यात कोहिनकरवाडी ग्रामपंचायतीचा निकाल जाहिर, सरपंचपदी पंढरी गणपत कोहिनकर
  57. सांगोला तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी शेकपाचे कोमल सुरेश डोईफोडे विजयी
  58. नाशिक तालुक्यात जललापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झेंडा, भगवान गबाले सरपंचपदी विजयी
  59. जळगावात भुसावळ तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खातं उघडलं, वेल्हाळा ग्रामपंचायतीवर शरद पवार गटाचा झेंडा, शारदा लक्ष्मण कोल्हे सरपंचपदी विराजमान
  60. इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी, एकनाथ गुलाब कातोरे सरपंच पदी विजयी
  61. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालूक्यातल्या गाजीपूर ग्रामपंचायतीवर वंचितचा झेंडा, वंचितच्या मिना सचिन दिवनाले 222 मतांनी विजयी
  62. जळगाव तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा एकहाती झेंडा, लोकनियुक्त सरपंच वैजंता शिरसाट यांच्यासह शिंदे गटाचे 10 सदस्य विजयी
  63. नागपूर नरखेड तालुक्यात अजित पवार गटाने उघडले खाते, बहुचर्चित खरसोली ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाची सत्ता, अजित पवार गटाच्या नीलिमा अरसडे यांचा सरपंच पदासाठी विजयी
  64. निफाड तालुक्यातील पोटनिवडणुकीत मनसेचा झेंडा, नाशिक जिल्ह्यात मनसे ने उघडले खातं, जव्हाळे ग्रामपंचायतीत सरपंचपदी संगीता कैलास गायकवाड 558 मते मिळावीत विजयी
  65. पैठण तालुक्यातील वडवाळी ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा विजय  नंदलाल काळे यांच्या पॅनलच्या उमेदवार काळे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
  66. अमरावतीत अचलपूर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतवर साधुराम येवले गटाचा परिवर्तन पॅनला एक हाती सत्ता, सरपंचपदी साधुराम येवले गटाच्या आशा गजानन येवले विजयी
  67. नागपूर कामठी तालुक्यातील गारलामध्ये काँग्रेसची सत्ता, सरपंच पदी ही काँग्रेस चे गणपत हरिभाऊ वानखडे विजयी
  68. देवळा मेशी ग्रामपंचायतीवर शिवसेनेची (ठाकरे गट) सत्ता, सरपंचपदी देवळा तालुकाप्रमुख बापुसाहेब साहेब जाधव विजयी
  69. संगमनेर तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायत मध्ये विखे गटाचा विजय, सरपंचपदी नितीन म्हतारबा आहेर विजयी
  70. नागपूर मौदा तालुक्यातील दहेगावमध्ये काँग्रेसची सत्ता, सरपंच पदी काँग्रेसचे संदीप आंबिलदुके विजयी
  71. नाशिक मालेगाव मांजरे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता, मांजरे सरपंचपदी सीमा अनिल निकम विजयी
  72. रायगड – रोहा तालुक्यातील तांबडी गावात  अजित पवार अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता, परशुराम पवार हे अजित पवार गटाचे उमेदवार सरपंचपदी विराजमान
  73. अहमदनगरमध्ये कर्जत – जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का, कुंभेफळ आणि खेडगावात  भाजपचा सरपंच, तर केवळ एका जागेवर करमणवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा विजय
  74. सिंधुदुर्गात वैभव नाईक यांना मतदारसंघात धक्का, वालावल ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, भाजपचे सरपंच राजा प्रभू विजयी
  75. इगतपुरी तालुक्यातील सातवा निकाल हाती, घोटी खुर्द ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा, सरपंचपदी काँग्रेसच्या माणिक निवृत्ती बिन्नर विजयी
  76. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा ग्रामपंचयातीमध्ये थोरात गटाची सत्ता, सरपंचपदी सोनाली संदीप कर्पे विजयी, यापूर्वी होती थोरात गटाची सत्ता
  77. नागपुरात हिंगणा तालुक्यातील धानोली गट ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सत्ता, सरपंचपदी विजय विठोबा भलावी राष्ट्रवादी (शरद पवार गट)
  78. माळशिरस दहिगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सोनम रणजीत खिलारे विजयी, स्थानिक नारी शक्ती गटाचं वर्चस्व
  79. इगतपुरी तालुक्यातील नववा निकाल हाती, धारगाव ग्रामपंचायत सरपंच पदी अपक्ष उमेदवार रेश्मा पांडुरंग पुंजारा विजयी
  80. चंद्रपुरातील राजुरा तालुक्यात सास्ती गावात सत्ता भाजपची, सरपंचपदी भाजपच्या सुचिता मावलीकर विजयी
  81. अहमदनगर राहाता तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल, भाजपच्या विखे पाटील गटाचा पराभव, भाजपचे विवेक कोल्हे गटाचा विजय, सरपंचपदी रोहिणी बाळासाहेब आहेर विजयी
2nd Page of Gram Panchayat Election 2024 Maharashtra List PDF
Gram Panchayat Election 2024 Maharashtra List

Gram Panchayat Election 2024 Maharashtra List PDF Download Free

REPORT THISIf the purchase / download link of Gram Panchayat Election 2024 Maharashtra List PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES