बुधभूषण | Budhbhushan Marathi PDF
बुधभूषण | Budhbhushan PDF Download in Marathi for free using the direct download link given at the bottom of this article.
बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे. बुधभूषण ग्रंथामध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयांवर श्लोक आहेत. तसेच, सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत.
वयाच्या १४ व्या बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला. संभाजी महाराज लिखित बुधभूषण या ग्रंथा मध्ये महाराजांनी राज्य प्रशासन कसे चालवायचे, त्या मध्ये काय नियम असावेत याचे वर्णन केले आहे. बुधभूषणा चा अभ्यास करून बरेच जणांनी पीएच.डी. / एम.फिल. अशा पदव्या मिळविल्या आहेत. बुधभूषणा चे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत आणि या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.
बुधभूषण प्रस्तावना | Budhbhushan PDF in Marathi
बुधभूषण हा स्वतंत्र ग्रंथ नसून, यामध्ये असलेले अनेक श्लोक संग्रहित आहेत. अर्थातच, हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आहे हे दिसून येते. वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथातून संभाजी महाराजांनी राज्य प्रशासन / राजनीती या विषयांना धरून निवडलेले श्लोक आणि त्यांचे योग्य वर्गीकरण करून त्या त्या विषयानुसार शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.
बुधभूषण ग्रंथामध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयांवर श्लोक आहेत. तसेच, सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत.
सुमारे ८९ विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन व्यंग रूपाचा खुबीदार वापर बुधभूषण मधील श्लोकांत झाला आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बुधभूषण पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता. बुधभूषण वाचून झाल्यावर आपले अभिप्राय नक्की कळवा.
आप नीचे दिए गए लिंक का उपयोग करके बुधभूषण | Budhbhushan PDF in Marathi में डाउनलोड कर सकते हैं।
