Sarth Amrutanubhav Marathi - Summary
कोणत्याही कार्याच्या आरंभीं तें कार्य निर्विघ्नपणे शेवटास जावें म्हणून मंगल करण्याचा श्रेष्ठाचार आहे. त्यास अनुसरून आम्हालाही मंगल kelein पाहिजे. कारण आम्ही ज्ञानेश्वर महाराज “अमृतानुभव” या ग्रंथाच्या अन्वयार्थविवरणाचें कार्य हातीं घेतलें आहे. तें निर्विघ्नपणें कडेस जावें म्हणून आरंभीं जें अभंगाचे कडवे आहेत, तें मंगल करणें होय.
Sarth Amrutanubhav Overview
ज्ञानेश्वर महाराजांनी शके १२१२ मध्ये नेवासें मुक्कामी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी अथवा भावार्थदीपिका नांवाची प्राकृत टीका लिहून आपले सद्गुरु जे निवृत्तिनाथ, त्यांच्या चरणीं सादर केली. ती पाहून सद्गुरु निवृत्तिनाथ म्हणाले, “या तुझ्या टीकेचा कोणी सत्संप्रदायपूर्वक विचार करें, ते आत्मज्ञानसंपन्न होतील. आता तूं स्वतःच्या बुद्धीमत्तेने अमृत म्हणजे अखंड ब्रह्मसंज्ञित वस्तु, जी सर्वकाळ, सर्वदेशी व सर्वावस्थेत नित्य अपरोक्ष स्वयं सिद्ध आहे. तिचा अनुवाद कर.”
Sarth Amrutanubhav in Marathi (सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टि)
वेगळे करणे अशक्य आहे. ते एकच आहेत. तद्वत शिव आणि शक्ती यांना वेगळे करता येत नाही. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. नाण्याला दोन बाजू असतात: एक काटा आणि दुसरा छापा. आपण नाणं हातात घेतले तर त्याची एक बाजू दिसली तरी दुसरी बाजू सुद्धा आपल्या हाती येतेच. फक्त काटा किंवा फक्त छापा हातात घेता येत नाही. जीव सृष्टीचे अस्तित्व हे असेच आहे; देह शिव आणि प्राण चैतन्य हे एकच आहेत, इतके ते एकरूप झाले आहेत. पण सामान्य जीवाच्या हे लक्षांत येत नाही. वेड्यासारखे आपण आपल्या देहावर, त्यातून निर्माण होणाऱ्या इच्छांवर, वासनेवर प्रेम करतो, पण ज्या शक्तीमुळे हा देह टिकून आहे, इच्छापूर्ती होणार आहे, त्याकडे दुर्लक्ष होते आणि अपूर्णता वाट्यास येते.
You can download the Sarth Amrutanubhav Marathi PDF using the link given below.