Vat Savitri Vrat Katha Marathi Marathi PDF

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

Vat Savitri Vrat Katha Marathi in Marathi

विवाहित म्हणजे सुवासिनी महिलांच्या आयुष्यात वटपौर्णिमेला (vatpoornima) खूप महत्व असते. ज्येष्ठ पौर्णिमा (Jyeshtha Purnima) ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सावित्रीने (Savitri) यमदेवांकडून (Yum) आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली होती.

तेव्हापासून पतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचारतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवाने सत्यवानाला (Satyavan) आयुष्य परत दिले. त्यामुळे सुवासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करतात. आज वटपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने आपण वट सावित्री व्रत कथा जाणून घेणार आहोत

वटसावित्रीची कथा

पौराणिक कथेनुसार, भद्र नावाच्या राज्यात अश्र्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यानंतर अश्वपती राजाने तिला स्वत:चा पती निवडण्यास सांगितले. त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. शाल्व नावाच्या राज्यात धृमत्सेन नावाचा अंध राजा राज्य करत होता. सत्यवान हा याच राजाचा पुत्र होता.

धृमत्सेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता. त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसह जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त एक वर्षांचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. पत्र सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी लग्न केले. लग्नानंतर ती जंगलात येऊन सत्यवान आणि सासू-सासऱ्यांसोबत राहून त्यांची सेवा करु लागली.

एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो. सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते. लाकडं तोडता तोडता सत्यवानला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो. यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात. पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते.

वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व ( Vat Puja)

PDF's Related to Vat Savitri Vrat Katha Marathi

Vat Savitri Vrat Katha Marathi PDF Download Free

SEE PDF PREVIEW ❏

REPORT THISIf the download link of Vat Savitri Vrat Katha Marathi PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If Vat Savitri Vrat Katha Marathi is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version