Sutrasanchalan Marathi PDF

Sutrasanchalan Marathi in PDF download free from the direct link below.

Sutrasanchalan Marathi - Summary

सूत्रसंचालन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला व्यवस्थितपणे पुढे नेण्यासाठी केलेले निवेदन. कार्यक्रमाच्या यशात “सूत्रसंचालन” महत्वाची भूमिका निभावतं. जर सूत्रसंचालन चांगलं नसेल, तर प्रेक्षकांना कार्यक्रमात मजा येत नाही.

सूत्रसंचालन महत्त्वाचे का आहे?

“सूत्रसंचालन” ह्या शब्दाचा अर्थ “सूत्रांच्या माध्यमातून नियमितपणे संचालन करणे” आहे. हे विशेषतः शैक्षणिक विषयांमध्ये वापरले जाते. उदाहरणार्थ, गणितातील गणितसूत्रे किंवा व्याकरणातील वाक्यरचना सूत्रांमध्ये याचा उपयोग केला जातो. हे सर्व एकत्र करून, “सूत्रसंचालन” हे कार्य सुसंगतपणे आणि प्रगतीसाठी आवश्यक आहे.

सूत्रसंचालन मराठी (Sutrasanchalan Lyrics in Marathi)

स्वागतम स्वागतम स्वागतम
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.

मी………… सर्व प्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो…..

हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे. इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख केला आहे. शब्दब्रह्मही म्हंटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो. जय मराठी!

You can download the Sutrasanchalan Marathi PDF using the link given below.

Sutrasanchalan Marathi PDF Download