शिव तांडव स्तोत्र मराठी – Shiv Tandav Stotram - Summary
Hello, Friends! Today, we are excited to share the Shiv Tandav Stotram Marathi PDF to assist all devotees. If you’re looking for the Shiv Tandav Stotram PDF in Marathi, you’ve come to the right place. You can easily download it from the link given at the bottom of this page for free.
Shiv Tandav Stotram हे भोलेनाथांच्या महान भक्त विद्वान रावणाने रचलेले स्तोत्र आहे. हे स्तोत्र पंचचामर श्लोकांत आहे. असे मानले जाते की, जेव्हा रावण कैलास सोबत चालू लागला, तेव्हा भगवान शिवाने कैलासला आपल्या अंगठ्याने दाबले. त्यामुळे कैलास तिथेच राहिला आणि रावणाचे दमन झाले. तेव्हा रावणाने शिवाची स्तुती केली आणि मग शिव प्रसन्न झाले. रावणाने केलेली ही स्तुती शिव तांडव म्हणून ओळखली जाते. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे श्लोक प्रसिद्ध आहेत. त्यापैकी आपण या ठिकाणी शिव भक्त रावण यांनी शंकराला प्रसन्न करण्यासाठी पठन केलेल्या शिव तांडव या स्तोत्राबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. रावण यांना भगवान शिव यांचे परम भक्त मानलं जाते. त्यांनी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी या स्तोत्राची रचना केली होती. या शिव तांडव स्तोत्राबाबत अशी मान्यता आहे की, ज्यावेळी रावण कैलास पर्वताला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन जात होते, त्यावेळी, भगवान शिव यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याच्या साह्याने तो पर्वत खाली दाबला.
शिव तांडव स्तोत्र मराठी – Shiv Tandav Stotram Marathi
जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
गलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम् |
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् || ०१
मराठी – जटांच्या जंगलातून वाहणा-या (गंगेच्या) प्रवाहाने विशुद्ध झालेल्या ठिकाणी, गळ्यात लोंबणारी सापांची जाडजूड माळ अडकवून डमरूतून डमड्डमड्डमड्डम असा आवाज काढणारा व महाभयंकर तांडव करणारा शंकर आमचे कल्याण करो.
जटावनी जलप्रवाह शुद्ध ज्या स्थला करी
गळ्यात जाडजूड सर्पमाळ लोंबते बरी ।
ध्वनी डमड्डमड्डमड्डमड्ड डम्रुचा निनादता
करो महेश घोर तांडवात आमुच्या हिता ॥ ०१
जटाकटाहसम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरी-
-विलोलवीचिवल्लरीविराजमानमूर्धनि |
धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके
किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम || ०२
मराठी- ज्याच्या मस्तकावरील जटांच्या विस्तीर्ण डोहात गोंधळून फिरतांना अस्थिर चंचल लाटांची वेलबुट्टी करणारी गंगा आरूढ झाली आहे, ज्याच्या कपाळपट्टीवरील अग्नी धगधगत आहे, ज्याच्या मस्तकावर चंद्रकोर आहे अशा (शंकरा) बद्दल मला नेहेमी प्रेम वाटते.
Download the Shiv Tandav Stotram PDF
आप नीचे दिए गए लिंक का उपयोग करके शिव तांडव स्तोत्र मराठी | Shiv Tandav Stotram PDF Marathi में डाउनलोड कर सकते हैं।
To obtain the Shiv Tandav Stotram Marathi PDF for free, click the link below and enjoy the divine experience.