महाराष्ट्राचा 2022 | Maharashtra Budget 2022-23 Marathi PDF
महाराष्ट्राचा 2022 | Maharashtra Budget 2022-23 PDF Download in Marathi for free using the direct download link given at the bottom of this article.
Hello, Friends today we are sharing with you Maharashtra Budget 2022-23 PDF to help you. If you are searching Maharashtra Budget 2022-23 Highlights PDF then you have arrived at the right website and you can directly download from the link given at the bottom of this page. In this PDF you can get full information regarding the new or latest scheme announced by the Maharashtra government in this budget 2022-23
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडला. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीच्या आधारे हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांवरही भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
महाराष्ट्राचा 2022 | Maharashtra Budget 2022-23 PDF Highlights
- कृषी विभागाला 3 हजार 35 कोटी रुपये
- सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाला 1 हजार 512 कोटी रुपये
- जलसंपदा विभागाला 13 हजार 552 कोटी व खारभूमी विकासासाठी 96 कोटी रुपये
- रोजगार हमी योजनेसाठी सन 2022-23 मध्ये 1 हजार 754 कोटी आणि फलोत्पादनासाठी 540 कोटी रुपये
- मृद व जलसंधारण विभागाला 3 हजार 533 कोटी रुपये
- पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाला 406 कोटी 1 लाख रुपये
- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला 3 हजार 183 कोटी रुपये
- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला 2 हजार 61 कोटी रुपये
- कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विकास विभागाला 615 कोटी रुपये
- उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 1 हजार 619 कोटी रुपये
- शालेय शिक्षण विभागाला 2 हजार 354 कोटी व क्रीडा विभागाला 385 कोटी रुपये
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला सर्वसाधारण योजनेकरीता 2 हजार 876 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरीता 12 हजार 230 कोटी असा एकूण 15 हजार 106 कोटी रुपये
- इतर मागास बहुजन कल्याण विभागाला 3 हजार 451 कोटी रुपये
- आदिवासी विकास विभागाला 11 हजार 199 कोटी रुपये
- महिला व बालविकास विभागाला 2 हजार 472 कोटी रुपये
- ग्रामविकास विभागाला 7 हजार 718 कोटी रुपये तसेच गृहनिर्माण विभागाला 1 हजार 71 कोटी रुपये
- सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासासाठी 15 हजार 673 कोटी रुपये व इमारती बांधकामासाठी 1 हजार 88 कोटी रुपये
- परिवहन विभागाला 3 हजार 3 कोटी, बंदरे विकासासाठी 354 कोटी तसेच नगरविकास विभागाला 8 हजार 841 कोटी रुपये
- उद्योग विभागाला 885 कोटी रुपये
- ऊर्जा विभागाला 9 हजार 926 कोटी रुपये
- पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला 3 हजार 223 कोटी रुपये
- मदत व पुनर्वसन विभागाला 467 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. शिवाय, नैसर्गिक आपत्ती मदत व इतर अनिवार्य खर्चासाठी 10 हजार 655 कोटी 73 लाख 7 हजार रुपयाची तरतुद प्रस्तावित आहे. कामगार विभागाला 125 कोटी रुपये
- विधी व न्याय विभागाला 578 कोटी रुपये
- पर्यटन विकासासाठी 1 हजार 704 कोटी व सांस्कृतिक कार्य विभागाला 193 कोटी रुपये
- अल्पसंख्यांक विकास विभागाला 677 कोटी रुपये
- गृह विभागाला 1 हजार 892 कोटी रुपये
- महसुल विभागाला 347 कोटी व वन विभागाला 1 हजार 995 कोटी रुपये
- पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला 253 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
- नियोजन विभागाला 6 हजार 818 कोटी 99 लाख रुपये
- मराठी भाषा विभागाला 52 कोटी, सामान्य प्रशासन विभागाला 1 हजार 139 कोटी, माहिती तंत्रज्ञान विभागाला 702 कोटी व माहिती व जनसंपर्क विभागाला 265 कोटी रुपये
Maharashtra Budget 2022-23 PDF
You can download the महाराष्ट्राचा 2022 | Maharashtra Budget 2022-23 PDF using the link given below.
