Kakada Bhajan - Summary
कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे. काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात.
Kakada Bhajan – काकडा भजन मराठी
भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |
पंचप्राण जीवे – भावे ओवाळू आरती ||१||
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||
काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |
कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||
राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही
मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||४||
विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू |
कोटी रवी – शशी जैसे दिव्य उगवले हेळू ||५||
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ||६||[३]
सत्व-रज-तमात्मक काकडा केला|
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला||[३]
Abhang Lyrics in Marathi
अभंग – १
श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य–
रुप पाहतां लोचनी ॥ सुख झालें वो साजणी ॥ इत्यादि मागील प्रमाणे
अभंग – २
श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य–
विष्णुविण मार्ग घेसील अव्यंग वेरी वायांचि सोंग करणी तुझी ॥१॥
येऊनि संसारा वायांचि ऊंजीगरा ॥ कैसेनि ईश्वरा पावसी हरि ॥धृ०॥
नरदेहा कैचे तुज होय साचे ॥ नव्हेरें हिताचें सुख तुज ॥२॥
ज्ञानदेव ह्मणें शरण रिघणें ॥ वैकुंठीचें पणें अंती तुज ॥३॥ ॥धृ०॥
अभंग – ३
श्रीनामदेव महाराज वाक्ये–
स्वप्नी तेनी सुखे मानीताहि सुख ॥ घेतलीया विक चाईल देहें ॥१॥
मोलाचे आयुष्य दवडीता देवाया ॥ मध्याह्याची छाया जाय वेगी ॥२॥
वेगी करी भजन काळमये श्रेष्ठ ॥ कैसेनी वैकुंठ पावसी जेणें ॥३॥
बाप रुखमा दैवीवरू विठठल हा उभा ॥ डर्वत्र घटी प्रभा त्याची आहे ॥४॥
अभंग – ४
श्री तुकाराम महाराज वाक्य–
कामें नलौचित नेदी अवलोकुं मुख ॥ बहुवाटे दु:ख फुटो पाहे ह्रदया ॥१॥
कांजी सासुरवासी मज केलें भगवंता ॥ आपुलीया सत्ता त्वाधिनता ते नाही ॥२॥
प्रभा तेंसी वाटे तुमच्या यावे दर्शना ॥३॥
येथें न चलें चोरी उरली राहे वासना ॥४॥
येथें अवघें वाया गेलें दीसती सायास ॥ तुका ह्मणे नाम दिसे जाल्या वेशाचा ॥५॥
अभंग – ५
श्री तुकाराम महाराज वाक्य–
ऐसा वाट पाहे कांही निरोप कां मूळ ॥ कांहो कळवळा तुह्मां उमटेचीना ॥१॥
आहो पांडूचंगे पंढरीचे निवासे ॥ लावुनिया आसे चाळवूनी ठेविलें ॥२॥
काय जन्मा येऊनीयां केली म्या जोडी ॥ ऐसा घडीघडी चिंता येतों आठव ॥३॥
तुका ह्मणे खरा नपवेचि विभाग ॥ धिक्कारीते जग हेंचि लाहो हिशोबे ॥४॥
अभंग – ६
श्री तुकाराम महाराज वाक्य–
कांगा केविलवाणा केलो दिनाच्या दीन ॥ काय तुझी हीन शक्ति जालीसी दासें ॥१॥
लाय येतें मना तुझा म्हणविता दास ॥ गोडी नाही रस बोलिलीया सारखी ॥२॥
लाजविली मांगे संताचीही उत्तरें ॥ कळो येतें खरें दुजें एकावरुनी ॥३॥
तुका ह्मणी माजा कोणि वदविली वाणी प्रसादा वांचुनी तुमचीया विठठला ॥४॥
अभंग – ७
श्री तुकाराम महाराज वाक्य–
जळो माझे कर्म वाया केली कटकट ॥ जालें जैसें तंट नादी आले अनुभव ॥१॥
आता पुढें धीर काय देऊं या मना ॥ ऐसें नारायण प्रेरिले ते पाहिजे ॥२॥
गुणवंत केलों दोष जाणाया साठी ॥ माझें माझे पोटी वळकट दुषण ॥३॥
तुका ह्मणी अहो केशीराजा दयाळा ॥ बरवा हा लळा पाळियेला शेवटी ॥४॥
You can download the Kakada Bhajan Marathi PDF by using the link given below.