संपूर्ण गुरुचरित्र (Guru Charitra) Marathi

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

संपूर्ण गुरुचरित्र - Guru Charitra Marathi

गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदान्त आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही. नृसिंह सरस्वती या व्यक्तीपेक्षा गुरू या पदाला आणि गुरु – शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्त्व दिलेले आढळते. सरस्वती गंगाधर हे श्रीनृसिंहसरस्वतींचे एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ गुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे.इ. स. १४८० च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असे मानले जाते.

या मूळ मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर केले. हे संस्कृत गुरुचरित्र बहुशः अनुष्टुभ छंदात रचले आहे. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.सरस्वती गंगाधर यांची मातृभाषा कानडी होती. त्यामुळे कानडी भाषेतील काही लकबी त्यात आढळतात.

Guru Charitra Marathi

मराठी गुरुचरित्रात अनेक पाठभेद आहेत. अशा अनेक पाठांच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करून गुरुचरित्राची एक प्रमाणित प्रत विसाव्या शतकात श्री. रामचंद्र कृष्ण कामत यांनी सिद्ध केली. कामत यांच्या प्रतीवर सायंदेव प्रतीचा गाढ ठसा दिसून येतो. कामत यांची प्रमाणित प्रत आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या परंपरेतले श्री वामनराव गुळवणी यांच्या वापरात असलेली चित्रशाळा प्रत या गुरुचरित्राच्या पाठासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय प्रती आहेत.

You can download the Guru Charitra Marathi PDF using the link given below.

2nd Page of संपूर्ण गुरुचरित्र (Guru Charitra) Marathi PDF
संपूर्ण गुरुचरित्र (Guru Charitra) Marathi

संपूर्ण गुरुचरित्र (Guru Charitra) Marathi PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of संपूर्ण गुरुचरित्र (Guru Charitra) Marathi PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES