Gurucharitra 52 Adhyay Marathi (गुरूचरित्र 52 अध्याय) Marathi PDF

Gurucharitra 52 Adhyay Marathi (गुरूचरित्र 52 अध्याय) in Marathi PDF download free from the direct link below.

Gurucharitra 52 Adhyay Marathi (गुरूचरित्र 52 अध्याय) - Summary

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. “गुरूचरित्र 52 अध्याय” म्हणजे पवित्र गुरु नृसिंहसरस्वती यांचं चरित्र, जो भक्तांना त्यांच्या समस्यांमध्ये मार्गदर्शन करतो. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहिले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या आठवड्यातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात नृसिंहसरस्वती यांचे चरित्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दू आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्‍या पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.

गुरूचरित्र 52 अध्याय 

श्री गुरु चरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंहसरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्यानुसार वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

गुरूचरित्र 52 अध्याय  – Gurucharitra 52 Adhyay Marathi

।। श्रीगणेशाय नमः ।।

नामधारक विनवी सिद्धासी । श्रीगुरु निघाले शैल्ययात्रेसी ।

पुढें कथा वर्तली कैसी । तें विस्तारेंसी मज सांगावें ॥१॥

सिद्ध म्हणे शिष्योत्तमा । काय सांगूं सद्‌गुरुची महिमा ।

आतां वर्णनाची झाली सीमा । परी गुरुभक्तिप्रेमा नावरे ॥२॥

श्रीगुरु सिद्ध झाले जावयासी । श्रीपर्वतीं यात्राउद्देशीं ।

हा वृत्तान्त नागरिक जनासी । कळला परियेसीं तात्काळ ॥३॥

समस्त जन आले धावत । नरनारी सर्व मिळाल्या बहुत ।

गुरुसी प्रार्थित अनेक भक्त । श्रीपर्वतासी स्वामी कां जातां ॥४॥

आम्हांसी भासतें व्यक्त । तुम्ही अवतार करितां समाप्त ।

निरंतर आपण असा अव्यक्त । परिजनांसी सुव्यक्त दिसत होतां ॥५॥

तुमचे चरणांचें होतां दर्शन । पातकांचें होतसे दहन ।

आतां कैसें करतील जन । म्हणोनि लोटांगणें घालिती ॥६॥

पुढें आम्हांस काय गति । आम्हीं तरावें कैशा रीतीं ॥

स्वामीचे चरण नौका होती । तेणें पार उतरत होतों ॥७॥

तुम्ही भक्तास कामधेनूपरी । कामना पुरवीत होतां बरी ।

म्हणोनि जगले आजवरी । याउपरी आम्हीं काय करावें ॥८॥

स्वामीकरितां गाणगापूर । झालें होतें वैकुंठपूर ।

आतां दीपाविणें जैसें मंदिर । तैसें साचार होईल हें ॥९॥

माउलीविणें तान्हें बाळ । कीं देवाविणें देऊळ ।

जळाविणे जैसें कमळ । तैसें सकळ तुम्हांविणें ॥१०॥

इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारकासी सांगत ।

श्रीगुरुप्रसाद झाला प्राप्त । द्विपंचाशत्तमोऽध्यायः ॥६१॥

You can download the (गुरूचरित्र 52 अध्याय) Gurucharitra 52 Adhyay Marathi PDF using the link given below.

RELATED PDF FILES

Gurucharitra 52 Adhyay Marathi (गुरूचरित्र 52 अध्याय) Marathi PDF Download