Vat Savitri Vrat Katha Marathi Marathi PDF

Vat Savitri Vrat Katha Marathi in Marathi PDF download free from the direct link below.

Vat Savitri Vrat Katha Marathi - Summary

विवाहित म्हणजे सुवासिनी महिलांच्या आयुष्यात वटपौर्णिमेला (vatpoornima) खूप महत्व असते. ज्येष्ठ पौर्णिमा (Jyeshtha Purnima) ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सावित्रीने (Savitri) यमदेवांकडून (Yum) आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली होती.

तेव्हापासून पतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचारतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवाने सत्यवानाला (Satyavan) आयुष्य परत दिले. त्यामुळे सुवासिनी महिला वडाच्या झाडाचे पूजन करतात. आज वटपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने आपण वट सावित्री व्रत कथा जाणून घेणार आहोत

वटसावित्रीची कथा

पौराणिक कथेनुसार, भद्र नावाच्या राज्यात अश्र्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यानंतर अश्वपती राजाने तिला स्वत:चा पती निवडण्यास सांगितले. त्यानुसार सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. शाल्व नावाच्या राज्यात धृमत्सेन नावाचा अंध राजा राज्य करत होता. सत्यवान हा याच राजाचा पुत्र होता.

धृमत्सेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता. त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलांसह जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त एक वर्षांचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. पत्र सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी लग्न केले. लग्नानंतर ती जंगलात येऊन सत्यवान आणि सासू-सासऱ्यांसोबत राहून त्यांची सेवा करु लागली.

एक दिवस सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी जातो. सावित्री देखील त्यांच्यासोबत जाते. लाकडं तोडता तोडता सत्यवानला भोवळ येते आणि तो जमिनीवर पडतो. यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात. पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते.

वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व ( Vat Puja)

  • वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.
  • वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत
  • फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.

RELATED PDF FILES

Vat Savitri Vrat Katha Marathi Marathi PDF Download