मृत्युंजय – शिवाजी सावंत (Mrutyunjay) Marathi PDF

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

मृत्युंजय – शिवाजी सावंत (Mrutyunjay) Marathi

मृत्युंजय (Mrutyunjay) एक महान इतिहासिक कादंबरी है जिसे श्री शिवाजी सावंत लिखी थी। यह कादंबरी महाभारत के एक रुख को बताती है, जिसमें भीष्म पितामह अपने आखिरी गद्यों को अर्जुन के उपदेश के माध्यम से प्रस्तुत करते हैं। यह किताब संस्कृत में लिखी गई थी और बाद में अनुवादित हुई।

“मृत्युंजय” कादंबरी महाभारत के इस महत्वपूर्ण और उदार रुख को प्रस्तुत करती है, जो हमें धर्म, नीति और विचारों के महत्व को समझने के लिए प्रेरित करता है। यह कादंबरी भारतीय साहित्य का एक अद्वितीय गहना है और इसके लेखक श्री शिवाजी सावंत का योगदान अत्यधिक मूल्यवान है।

मृत्युंजय कादंबरी – Mrutyunjay Book Download

हिरण्यकेशी नदीच्या तीरावर वसलेल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या निसर्गसुंदर व छोटेखानी, टुमदार गावात एका शेतकरी कुटुंबात, ३१ ऑगस्ट १९४० साली शिवाजीराव सावंत यांचा जन्म झाला. तिथंच व्यंकटराव प्रशालेतून ते शालान्त परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. परिस्थितीमुळे महाविद्यालयीन शिक्षणाला एफ.वाय.बी.ए. नंतर रामराम ठोकून त्यांना वाणिज्य विषयाच्या लघुलिपी आणि टंकलेखन यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला. कोल्हापुरातील राजाराम प्रशालेमध्ये त्यांनी अध्यापक म्हणून वीस वर्षे सेवा केली. तेथून परसेवेवर पुण्यात येऊन महाराष्ट्रर शासनाच्या शिक्षण खात्याच्या ‘लोकशिक्षण’ मासिकामध्ये त्यांनी सहा वर्षे काम पाहिले.

भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल सावंतांना प्रारंभापासूनच सार्थ अभिमान होता. ‘माझा भारत म्हणजेच महाभारत,’ हे समीकरण एकदा मनात रुजल्यानंतर अभ्यासूवृत्तीमुळे त्यांचा महाभारताचा सखोल व्यासंग सुरू झाला. अस्मिता विसरू पाहत असलेल्या भारतीय समाजपुरुषाला सूर्यपुत्र, ‘मृत्युंजय’ कर्ण आपत्तीतही धैर्यशाली व तेजस्वी बनवील, असे उत्तर त्यांना गवसले. मग प्रदीर्घ संदर्भशोधन, सखोल व उलट-सुलट चिंतन, मनन आणि डोळस प्रवासाने टिपलेले प्रत्ययकारक निरीक्षण यातूनच या प्रदीर्घ व रससंपन्न कादंबरीचा जन्म झाला.

महाराष्ट्र शासन, केसरी-मराठा संस्थेने न. चिं. केळकर : तसेच कोल्हापूरच्या ‘ललित’ आणि पुणे महानगरपालिका यांनी पारितोषिक देऊन ‘मृत्युंजय’चा गौरव केला. सर्वांत लक्षणीय गोष्ट म्हणजे मर्मज्ञ आणि गुणज्ञ बंगाली वाचकांच्या ‘विवेक संस्थान’ या कलकत्त्यातील संस्थेने वीस वर्षांनंतर १९८६ साली ‘पूनमचंद भुतोडिया’ हा सर्जनशील साहित्याचा पुरस्कार देऊन ‘मृत्युंजय’चा सन्मान कैला होता. दिल्लीतील भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने १९९५ सालचा १२वा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ भारताचे उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते दिल्लीत परदान करून त्यांना सन्मानित केले होते.

१९७४ सालीच दिल्लीतील भारतीय ज्ञानपीठ या विख्यात प्रकाशन संस्थेने ‘मृत्युंजय’चे हिंदीत भाषांतर प्रकाशित केले. मृत्युंजयची कन्नड – १९९०, गुजराथी – १९९१ व मल्याळम १९९५ अशी भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत. १९८९मध्ये – ‘मृत्युंजय’चे कलकत्त्यातील प्राध्यापक पी. लाल यांनी इंग्लिशमध्ये भाषांतर प्रसिद्ध करून ही मूळ मराठी कर्णगाथा आता आंतरराष्ट्रीय साहित्यात नेण्याचे ऐतिहासिक कार्यही केले आहे. गुजराथी भाषांतराला अहमदाबाद येथे त्या राज्य शासनाने आप ‘साहित्य अकादमी’ हा पुरस्कार देऊन १९९०मध्ये गौरविले आहे. १९९२मध्ये याच भाषांतराला ‘केंद्रीय साहित्य अकादमी’ चा पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

१९८० साली सावंतांनी छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावरील ‘छावा’ ही कादंबरी लिहून वाचकांसमोर ठेवली. तिचाही हिंदी अनुवाद ज्ञानपीठाने प्रसिद्ध केला आहे. ही कलाकृतीही महाराष्ट्र राज्य पुरस्काराची मानकरी ठरली.

सावंतांनी १९७५ साली लिहिलेले ‘मृत्युंजय’ हे नाटक मोहन वाघांच्या चंद्रलेखा या नाट्यसंस्थेने मराठी रंगमंचावर पुरे एक तप सादर केले. ‘छावा’ नाटकही त्यांनीच सादर केले.

१९८३ साली सावंत बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. १९८६मध्ये बेळगावला द. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले होते. तसेच ते महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेत उपाध्यक्षही होते.

१९८६ साली ऑगस्टमध्ये सावंतांनी महाराष्ट्राच्या कृषि औद्योगिक आघाडीवर आद्य जनकाचे काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची ‘लढत’ नावाची द्विखंडात्मक चरितकहाणी वाचकांना सादर केली. त्यांची ‘संघर्ष’ ही गोदी व माथाडी कामगारांचे झुंजार नेते भाई मनोहर कोतवाल यांच्यावरील चरितकहाणी प्रकाशित झाली आहे.

विविध पैलूमय जीवन लाभलेल्या व भारतीयांना सदैव प्रेरक आदर्श असलेल्या योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या चरित्रग्रंथावर ‘युगंधर’ ही कादंबरी त्यांनी सिद्ध केली. रामकृष्ण – मिशनच्या हरिद्वार मठाच्या प. पू. स्वामी अकामानंद यांच्या हस्ते पूजन विधी होऊन ‘युगंधर’ शनिवार दि. २९ जुलै, २००० रोजी समारंभपूर्वक प्रकाशित झाली.

२००२मध्ये त्यांची माननीय पी. के. अण्णा पाटील यांच्यावरील ‘पुरुषोत्तम नामा ही चरितरकहाणी प्रकाशित झाली. याच वर्षी भारतीय ज्ञानपीठाने ‘युगंधर’ चा हिंदी अनुवादही प्रकाशित केला.

सावंतांचा एकसष्टी समारोह बालगंधर्व रंगमंदिर येथे शनिवार, दि. ३० डिसेंबर, २००० रोजी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या शुभहस्ते व ज्येष्ठ साहित्यिक भा. द. खेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

७६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कऱ्हाड येथे संपन्न होणार होते. त्यासाठी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या पुरचारार्थ सावंत दौऱ्यावर असताना त्यांना दि.. १८ सप्टेंबर, २००२ रोजी मडगाव-गोवा येथे आकस्मिक तीव्र हृदय आघातामुळे वैद्यकीय उपचार प्रयत्न करूनही मृत्यू आला.

सावंतांच्या मागे त्यांच्या पत्नी मृणालिनी, कन्या कादंबिनी धारप व मुलगा अमिताभ असा परिवार आहे.

You can download the मृत्युंजय – शिवाजी सावंत (Mrutyunjay) in PDF format using the link given below or an alternative link.

2nd Page of मृत्युंजय – शिवाजी सावंत (Mrutyunjay) PDF
मृत्युंजय – शिवाजी सावंत (Mrutyunjay)

मृत्युंजय – शिवाजी सावंत (Mrutyunjay) PDF Download Free

REPORT THISIf the purchase / download link of मृत्युंजय – शिवाजी सावंत (Mrutyunjay) PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.