Ganpati Sthapana Puja Vidhi in Marathi (गणपती स्थापना कशी करायची)

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

गणपती स्थापना कशी करायची

गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावेत.

गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.

Ganpati Sthapana Puja Vidhi Marathi (गणपती स्थापना कशी करायची)

  • वेळ: खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. तसेच संस्कृतचे ज्ञान नाही ते या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात.
  • विधी: पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे. त्यामुळे संस्कृत न येणाऱ्यांची अडचण दूर होईल.
  • मुहूर्त: मूहूर्त पंचांगात पहा.
  • वस्त्र: पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा.
  • गंध: कपाळाला गंध लावून पूजा करा.
  • दिशा: दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करावी.
  • मूर्ती: गणपतीच्या दोनपेक्षा अधिक मूर्ती घरात ठेवू नये.
  • प्रदक्षिणा: श्री गणेशाला नेहमी एकच प्रदक्षिणा घालतात. अनेक नाही.
  • आसन: कुशाचे आसन किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडाच्या आसनावर बसून पूजा करू नये.
  • पूजेचे साहित्य: पूजा सूरू करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ आणून ठेवा. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात घ्या.
  • वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. परिधान केलेल्या वस्त्राने हात धुऊ नये.
  • मूर्ती स्थापना: पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा.
  • पूजन प्रारंभ

पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह विधी दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून त्याप्रमाणे कृती करावी.

  • दीप पूजन:  तूपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित करा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा.

‘हे दीप देवा ! मला नेहमी सुखी ठेव. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित रहा.’ यानंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका.
आसन पूजा: 
विधी: आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी केली जाते.
मंत्र: ‘हे माता पृथ्वी! आपण समस्त लोकांना धारण केले आहे, भगवान विष्णूलाही धारण केले आहे, अशा प्रकारे आपण मला धारण करून हे आसन पवित्र करा. (आसनावर पाणी शिंपडा)

स्वस्ती पूजन 
विधी: शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र जप केला जातो.

मंत्र: ‘हे त्रिलोका! मला शांतता लाभू दे. हे अंतरीक्षा! मला शांतता मिळू दे. हे पृथ्वी! मला शांतता लाभू दे. हे जला! मला शांतता लाभू दे. हे औषधीदेवा! मला शांती मिळू दे. हे विश्वदेवी! मला शांती मिळू दे. जी शांती परब्रम्हापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे.’ हे सदा कार्यात मग्न असणार्‍या सूर्य कोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दु:ख निवारण कर. ‘हे नारायणी! सर्व प्रकारची मंगल कामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी! आपण सर्व पुरूषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्या शरण आलो आहे. माझा नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रम्हा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.’

 आवाहन मंत्र

आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर।
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आवाहयामि।।

असे म्हणून मूर्तीला आवाहन सूचक अक्षता अर्पण कराव्यात.

विचित्र रत्नरचितम् दिव्यास्तरण संयुतम्।
स्वर्णसिंहासनम् चारु गृहाण सुरपूजित।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। आसनार्थे अक्षताम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेश मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात.

सर्वतीर्थ समानीतम् पाद्यम् गंधादि संयुतम्।
विघ्नराज गृहाणेदम् भगवन् भक्तवत्सल।।
श्रीसिद्धिविनायकाय नम:। पादयो: पाद्यम् समर्पयामि।।

असे म्हणून श्रीगणेशांच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.

Ganpati Aarti Lyrics Marathi

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळाचीजय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया

लंबोदर पितांबर फनी वरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती

2nd Page of Ganpati Sthapana Puja Vidhi in Marathi (गणपती स्थापना कशी करायची) PDF
Ganpati Sthapana Puja Vidhi in Marathi (गणपती स्थापना कशी करायची)

Ganpati Sthapana Puja Vidhi in Marathi (गणपती स्थापना कशी करायची) PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of Ganpati Sthapana Puja Vidhi in Marathi (गणपती स्थापना कशी करायची) PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.