Chautha Ank Marathi Book - Summary
मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत रवींद्र महाजनी यांचं 2023 मध्ये निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी ते मृतावस्थेत सापडले. त्यांच्या मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसला. महाजनी यांच्या मृत्यूच्या जवळपास 6 महिन्यांनी त्यांच्या पत्नी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी याची आई माधवी महाजनी यांनी त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.
चौथा अंक असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. नुकताच चौथा अंक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी माधवी महाजनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसंच अभिनेता गश्मीर महाजनी यानं पुस्तकातील प्रस्तावना सर्वांना वाचून दाखवली. प्रस्तावना वाचताना गश्मीर भावुक झाला.