बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म

महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या कामगारांचे भविष्य उज्वल होण्याकरिता महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारच्या योजना काढल्या आहेत आणि त्या योजनामध्ये बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे. या योजनेमार्फत बांधकाम करणाऱ्या कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगाराच्या मुलांचे शिक्षण करिता स्कॉलरशिप देणे, कामगाराच्या आरोग्यासाठी मदत देणे अशा अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजनेमार्फत सुरू केल्या आहेत. बांधकाम कामगार योजनेमार्फत कामगारांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा दिल्या जातात.

बांधकाम कामगार यादीसाठी पात्रता

 1. कामगार महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा
 2.  कामगाराचे वय 18 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान असावे
 3. कामगाराने मागील वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे
 4. कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे
 5. कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे
 6. योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारचा पहिल्या दोन मुलांसाठी योजना लागू होईल
 7. बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर, अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेच्या लाभ दिला जात नाही
 8. इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेच्या लाभ दिला जात नाही

बांधकाम कामगार योजना पेटी कागदपत्रे

 1. कामगार ओळखपत्र
 2. आधार कार्ड
 3. अर्जदाराच्या पासपोर्ट साईज फोटो
 4. कामगाराच्या मूळ गावाच्या रहिवासी दाखला
 5. बांधकाम कामगार म्हणून तीन महिने काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
 6. वय वर्ष 18 पूर्ण असल्याचा पुरावा

बांधकाम कामगार योजना उद्देश

 1. बांधकाम कामगार योजने मार्फत कामगारांचे जीवनमान व परस्थिती सुधारने
 2. बाल कामगारांना धोकादायक क्षेत्रात काम न करू देणे
 3. कामगारांची रोजगार क्षमता आणि रोजगाराची संधी वाढवणे
 4. कामगाराच्या कौशल्य विकास करणे
 5. कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी काम करणे
 6. कामगारांचे व्यवसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे
 7. कामगारांना घातक कामापासून बाल श्रम काढून श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकटीकरण प्राप्त करणे
 8. कामगारांच्या रोजगार सेवांचा प्रचार करणे

बांधकाम कामगार योजना के फायदे

 • सामाजिक सुरक्षा (Social security)
  • नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी 30,000 रुपये अनुदान म्हणून दिले जातात. त्यासाठी कामगाराला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोंदणीकृत लाभार्थी कामगारांना मोफत मध्यान्ह जेवण सुविधा या योजनेअंतर्गत दिली जाते.
  • बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या लाभ दिला जातो.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना उपयुक्त असलेली अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी अवजारे खरेदी करणार असल्याचे आम्ही पत्र देणे गरजेचे आहे.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्याला जीवन ज्योती विमा योजनेमार्फत विविध लाभ दिले जातात.
  • बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवले जातात.
  • दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगारास 30 हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
 • शैक्षणिक मदत (Educational Assistance)
  • महाराष्ट्र इमारत बांधकाम विभागात नोंदणी केलेल्या कामगाराचा पहिल्या दोन मुलांना पहिली ते सातवी मध्ये कमीत कमी 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असले, तर 2,500 रुपये प्रोत्सानात्मक शैक्षणिक आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्याकरिता 75 टक्के हजेरी बाबतच्या दाखला देणे गरजेचे आहे
  • नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा दोन मुलांना इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतील तर प्रतिवर्षी 500 रुपये प्रोत्सानात्मक शैक्षणिक मदत म्हणून दिले जातात
  • नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना इयत्ता 10 वी ते 12वी किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त असतील तर 10,000 रुपये शैक्षणिक आर्थिक मदत म्हणून दिले जातात त्यासाठी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगाराच्या दोन मुलांना अथवा पुरुष कामगार यांच्या पत्नीला पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचा प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी दरवर्षी 20,000 रुपये शैक्षणिक मदत म्हणून दिले जातात. त्याकरिता मागील शैक्षणिक इयत्ता पास झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्याची पावती किंवा बोनाफाईड सादर करणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना शासनमान्य पदवीके मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलास प्रति शैक्षणिक वर्षी 25,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात.
  • बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना संगणकाचे शिक्षण एम एस सी आय टी घेत असलेल्या नोंदणी केलेल्या कामगारांच्या मुलांना शुल्काची परिपूर्ती तसेच एम एस सी आय टी पास झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्याच्या फी शैक्षणिक आर्थिक मदत म्हणून दिली जाते.
  • बांधकाम कामगारांच्या मुलांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाते
 • आरोग्य विषयक मदत (Aarogya Vishayak Madat)
  • नोंदणी केलेला बांधकाम कामगार महिला असो किंवा पुरुष बांधकाम कामगार पत्नीला नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाते. त्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शास्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र आणि उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगार कुटुंबीयांना गंभीर आजार झाले तर त्यांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये वैद्यकीय मदत एकाच सदस्याला एकाच वेळी कुटुंबातील दोन सदस्यांच्या पर्यंत मर्यादित आहे. तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेच्या लाभ दिला जातो त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजाराबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार कागदपत्रे देणे आवश्यक आहे
  • बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपये मुदत बंद ठेव लाभ दिला जातो. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदार कामगाराला एक पेक्षा अधिक मुले नाहीत याच्या पुरावा आणि शपथपत्र आवश्यक आहे.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराला 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याला 2 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात.
  • बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असेल, तर विमा रकमेची परिपूर्ती किंवा कोणाला मार्फत 2 लाख रुपये आर्थिक मदत यापैकी कोणताही एक लाख दिला जातो. त्यासाठी कामगाराचे 75 टक्के अपंगत्व असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या देखील लाभ घेता येणार आहे. कामगारांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. त्यासाठी शासकीय केंद्रातून उपचार घेतल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म (संदर्भा साठी) डाउनलोड
बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म (संदर्भा साठी) डाउनलोड
* ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी)
* – नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे.
डाउनलोड
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी) डाउनलोड
ऑनलाइन नोंदणीसाठी: आधार संमती फॉर्म (संदर्भा साठी) डाउनलोड
ऑनलाइन नोंदणीसाठी: स्वयंघोषणापत्र (संदर्भा साठी) डाउनलोड

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.