प्रजासत्ताक दिन भाषण मराठी PDF

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले. त्या दिवसांपासून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो.  प्रजासत्ताक दिन हा भारताच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे, म्हणूनच हा दिन प्रत्येक जात आणि संप्रदाय मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा करतात.

2023 या वर्षी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाईल. भारत दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि लोकशाहीचा स्वीकार केला, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी. दुसर्‍या शब्दांत, 26 जानेवारी हा दिवस साजरा करतो ज्या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली.

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण व उत्सव साजरे केले जातात. पण काही सण असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली. भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली.

या दिवशी सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतींचे स्वागत करतात. तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्ही सेनेच्या तुकड्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. शालेय विद्यार्थी त हेत-हेची नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते. शौर्य गाजविणाऱ्या मुला-मुलींचा सन्मान केला जातो. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर परेडचे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात.

सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात. या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा होतात.

प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.

आप नीचे दिए गए लिंक का उपयोग करके प्रजासत्ताक दिन भाषण मराठी PDF में डाउनलोड कर सकते हैं ।

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी PDF Download Free

SEE PDF PREVIEW ❏

REPORT THISIf the download link of प्रजासत्ताक दिन भाषण मराठी PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If प्रजासत्ताक दिन भाषण मराठी is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version