आपत्ती व्यवस्थापन | Apatti Vyavasthapan Marathi PDF
आपत्ती व्यवस्थापन | Apatti Vyavasthapan PDF Download in Marathi for free using the direct download link given at the bottom of this article.
आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात.
आपत्ती व्यवस्थापन नाचे 3 प्रमुख टप्पे आहेत-
- आपत्ती पूर्व व्यवस्थापन – यामध्ये प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे
- आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन- प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन करणे व मदत यंत्रणा मध्ये समन्वय राखणे.
- आपत्ती नंतरचे व्यवस्थापन- आपत्ती नंतर करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे,इत्यादि
परिसर भूकंप, ज्वालामुखी, वादळवारे, पूर, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्ती माणसाला पुरत्या हतबल करून टाकतात. त्यासाठी सतत सतर्क राहावे लागते. या आपत्तींना तोंड देण्यासाठी विशेष प्रशिक्षणांनी युक्त माणसांना सज्ज ठेवावे लागते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑक्टोबर महिन्याचा दुसरा बुधवार राखून ठेवतात व या आपत्तींना आवर घालण्यासाठी करावयांच्या कारवायांची उजळणी करतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २२ डिसेंबर १९८९ च्या सर्वसाधारण अधिवेशनात नैसर्गिक आपत्तींना आवर घालण्यासाठी प्रस्तुत दिवसाची घोषणा झाली होती. १९९०-९९ हा काळ नैसर्गिक आपत्तींना आवर घालण्याचे दशक म्हणून घोषित झाले होते व या काळात सदर दिवसाचा सोहळा ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्या बुधवारी साजरा होत गेला.
