Story in Marathi (100+ मराठी कथा) - Summary
Motivational Story in Marathi (Small Story in Marathi)
1. आधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, जग आपोआप बदलेल
संध्याकाळची वेळ होती. एक म्हातारी व्यक्ती आपल्या गतकाळातील जीवनाविषयी आपल्या मित्राला सांगत होती. ती म्हातारी व्यक्ती म्हणाली, “मी जेव्हा तरुण होतो, तेव्हा मी खूप अहंकारी होत होतो. मला असं वाटायचं की मला सर्वच ज्ञान आहे. मला वाटायचं की मी सर्वकाही करू शकतो. सर्व बदलण्याची इच्छा मी करत होतो. मी देवाला प्रार्थना करायचो की, ‘हे देवा, मला जगाला बदलवण्याची शक्ती दे.’ तो व्यक्ती थोडा थांबला, व पुन्हा सांगू लागला, कारण वय वाढत चाललेलं होत.
एक दिवस सकाळी मी उठलो व विचार करू लागलो, ‘माझं अर्धं वय तर निघून गेलंय आणि मी तर काहीच केलेलं नाही. मी कोणाला बदलूही शकलो नाही.’ तेव्हा त्याने देवाला पुन्हा प्रार्थना केली व सांगितले की, ‘देवा, मला इतकी शक्ती दे की, मी अवतीभोवतीच्या लोकांना बदलू शकेन. कारण जे लोक माझ्या खूप जवळचे आहेत त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे.’
त्याचा मित्र त्याला म्हणाला, “आता काय विचार करतोस?” ती व्यक्ती म्हणाली, “आता मी म्हातारा झालोय. माझी प्रार्थना आता खूप साधी आणि छोटी आहे. मी देवाला प्रार्थना करतो की, ‘देवा, आता मला इतकी शक्ती दे की, मी कमीत कमी स्वत:ला तरी बदलू शकेन.’ मला कळून चुकलंय की जगाला किंवा इतर लोकांना बदलण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत.”
या कथेचा तात्पर्य: कारण स्वत:ला बदलल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून सर्वांत आधी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करा, जग आपोआप बदलेल.
2. ज्ञानी माणूस कोण?
मित्रांनो, एकदा एका खेडेगावातील एक मुलगी अविवाहित असतानाच माता बनली. खेडेगावातील लोकांना ते ऐकून धक्काच बसला, त्यांनी तिला चांगलं झोडपून काढलं आणि त्या जन्माला आलेल्या बाळाचा बाप कोण हे विचारलं. त्यानंतर आश्चर्याची बाब अशी की, तिने गावाच्या सीमेजवळ राहणाऱ्या एका झेन साधूचे नाव घेतले. सारे गावकरी त्याच्या मठाकडे गेले, त्यांनी त्याचं ध्यान चालू असताना त्याला शिव्या देत उठवलं आणि दांभिक म्हणून त्याची संभावना केली. “तू आमच्या गावातल्या एका मुलीसोबत पापाचरण केलं आहेस. आता तू आई आणि ते बाळ या दोघांचाही सांभाळ केला पाहिजेस.” तो झेन साधू एवढंच म्हणाला, “ठिक, असं आहे का?”
या कथेचा तात्पर्य: जेव्हा त्या साधूवर आरोप ठेवण्यात आले होते, तेव्हा त्याचं उत्तर एवढंच होतं की “ठिक, असं आहे का?” जी व्यक्ती स्तुती आणि निंदा दोन्ही लाही सारख्याच भावनेने बघते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने ज्ञानी असते. अर्थात् त्यासाठी अत्यंत मानसिक क्षमता हवी असते, अशी उच्च मानसिक स्थिती प्राप्त करण्यासाठी सर्वसाधारण व्यक्ती प्रयत्न करत असते.
3. क्षमा करायला शिका – Marathi Small Story For Students With Moral
एकदा एका शाळकरी मुलाला त्याने एक गंभीर चूक केली म्हणून त्याला शाळेच्या प्राचार्यांकडे पाठवण्यात आले. काय झालं ते ऐकल्यानंतर प्राचार्यांनी एक कोरी वही घेतली आणि त्यावर त्या मुलाचं नाव लिहिलं. मग त्यावर काय तक्रार होती ते लिहिता लिहिता प्राचार्य त्याला म्हणाले की, “मी हे सारं शिसपेन्सिलीने लिहितोय आणि तुझा गुन्हा गंभीर आहे, असं मी आता तरी समजत नाही. अर्थात् जर या वर्षभरामध्ये तुला दुसऱ्यांदा माझ्याकडे पाठवलं गेलं नाही, तर मी जे काही लिहिलं आहे ते खोडून टाकील आणि त्याबद्दल कुणालाच काहीही कळणार नाही.”
या कथेचा तात्पर्य: दया हा सद्गुण प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात ठसवावा असा आहे.
4. तुलना करू नका
एका वडाच्या झाडाच्या अगदी टोकावर एक लहानशी सुंदर चिमणी राहात होती. ती तिच्यासोबत चिमण्यांना आकाशामध्ये उंच उंच उडताना पाहायची आणि ती स्वत:ला कमी समजायची. तिला प्रत्येक गोष्टीमध्ये तिरस्काराची भावना निर्माण व्हायची. “तू मोराला छान रंग दिलेस, तू बुलबुल पक्ष्याला छान आवाज दिलास, पण मी? मला तू काहीही नाही दिलंस का?” तेव्हा एकदा देवाने उत्तर दिलं, “की तुला फक्त दु:ख भोगण्यासाठी निर्माण केलेले नाहीये आणि आता तूही तीच चूक करीत आहेस, जी माणूस नेहमी करीत असतो. तू स्वत: सारखे बनण्याचा प्रयत्न कर आणि तू स्वत:च श्रेष्ठ बनतेस की नाही ते बघ. तुझं स्वत:चं वेगळेपण जाणून घे आणि तुला ज्यामध्ये आनंद वाटेल अशा मार्गाने जाण्याचा आनंद तू मिळव.”
या कथेचा तात्पर्य: प्रत्येकजण देवाच्या प्रतिमे प्रमाणे बनवलेला आहे. त्याने बनवलेल्या प्रत्येक निर्मितीला वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व आहे. वास्तवाकडे आपण नेहमी एका सकारात्मक जीवन ऊर्जेच्या स्वरूपात बघायला हवे.
5. तुम्ही मनात जेवढा विचार करता फक्त तेवढेच तुमचे वय असते.
थॉमस एडिसन हा अशा काही मोजक्या लोकांपैकी एक होता ज्याचा ठाम विश्वास होता की वय तीच बाब असते, ज्याचा विचार तुम्ही तुमच्या मनात करीत असता. त्याच्या वयाच्या ऐंशीव्या वाढदिवसा दिवशी त्याच्या काही मित्रांनी त्याला सल्ला दिला की त्याने आता थोडी विश्रांती घ्यायला पाहिजे आणि आता स्वत:साठी जरा वेळ द्यायला पाहिजे.
“तुला आता स्वत:साठी कशाचा तरी छंद लावून घेणे योग्य होईल. तू गोल्फ का बरे खेळत नाहीस?” एडिसन म्हणाला, “पण अद्याप माझं तेवढं वय झालेलच नाहीये.”
या कथेचा तात्पर्य: अगदी रापलेल्या ऐंशीव्या वर्षीसुद्धा एडिसन स्वत:वर असा विनोद करीत होता की मी चांगला तरुण आहे. तुम्ही या पृथ्वीतलावर किती वर्षे काढली यावर वय अवलंबून नसतेच.
6. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद हा सुंदर बनवा – Short Marathi Story
सॉक्रेटिस हा कारागृहामध्ये होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला विषाचा प्याला द्यायचा होता, म्हणजेच त्याला मारलं जाणार होतं. त्याचक्षणी त्याचं लक्षात आलं की त्याच्यासोबत असणारा एक दुसरा कैदी कुणा एका कवीचं एक अवघड गीत अतिशय सुरेल गात होता. ते ऐकून सॉक्रेटिस त्याच्याकडे गेला आणि त्याला ते शिकवण्याची विनंती केली.
त्या कवीने त्याला म्हंटले की, “आता ते कशाला शिकायचं आहे? उद्या सकाळी तर तू मरणार आहेस ना?” सॉक्रेटिस त्याला म्हणाला, “कारण मग मी उद्या हे समजून शांतपणे मरेन की मरण्यापूर्वी मी आयुष्यात एक गोष्ट नवी शिकलो.”
या कथेचा तात्पर्य: आपण या सुंदर पृथ्वीतलावर जो प्रत्येक क्षण जगत असतो, त्याबद्दल आपण भगवंताचे आभार मानायला हवे.
7. ढोंगीपणापासून दूर रहा
एकदा एका शिक्षिकेने एक चॉकलेटचा डबा आणि एक शहाणपणा शिकवणारं पुस्तक दोन्हीही वर्गात आणले. मग तिने ते टेबलावर शेजारी शेजारी ठेवले आणि विद्यार्थ्यांना त्यापैकी एक निवडायला सांगितलं.
सारी मुलं त्या पुस्तकाभोवती गोळा झाली आणि हे पुस्तक वाचणं किती चांगलं असू शकेल, यावर चर्चा करू लागली. तथापि, तिथं एकजण होता ज्याने सरळ चॉकलेटचा डबा उघडला आणि आनंदाने एकेक चघळायला सुरुवात केली.
सगळ्या मुलांच्या प्रश्नार्थक नजरा पाहून शिक्षिका म्हणाली की मला तर चॉकलेटच्या या डब्यामध्ये त्या पुस्तकात जेवढं शहाणपण शिकवलं आहे, तेवढंच दिसतंय.
या कथेचा तात्पर्य: ज्या मुलाने चॉकलेटच्या डब्याची निवड केली, त्याचं हृदय खरं तर प्रामाणिक होते, कारण ढोंगीपणा काही जास्त काळ चालत नाही. ढोंगीपणा पासून दूर राहणे शिकले पाहिजे.
8. तुम्हीच तुमचा वर्तमान आणि भविष्यही आहात
एक गृहस्थ अगदी ऐषारामात राहत असताना त्याला अचानक नैराश्य आले आणि तो दु:खी झाला. त्यामुळे जरी तो खूप होतकरू होता तरीही तो आपल्या कामाकडे आणि आपल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी व्यवस्थित लक्ष देऊ शकला नाही.
त्याने त्याच्या उद्दिष्टांचा पाठलाग करणे सुरुच ठेवले, पण त्यामुळे त्याचा वर्तमानाशी संबंध तुटल्यासारखा झाला. अर्थातच, त्याचा परिणाम त्याच्या कामावर झालाच. त्याचा परिणाम म्हणून तो पुन्हा दु:खी झाला.
त्याने पुन्हा अंतर्मुख होऊन चांगल्या प्रकारे कारण जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या या अवस्थेचं नेमकं कारण काय आहे, हे काही त्याला सांगता येईना. सरते शेवटी, तो एका ज्ञानी पुरुषाकडे गेला आणि त्याला नेमकं काय होतंय, हे सांगितलं.
त्याचं सारं ऐकून घेतल्यानंतर तो साधुपुरुष म्हणाला, “भल्या माणसा, तुझ्या मनाची अवस्था अशी दु:खी होण्याचं कारण इतर काही नाही, तू स्वत:च आहेस. तू स्वत:चं उद्दिष्ट तुझ्या डोळ्यासमोर स्वच्छ दिसत असताना मृगजळाच्या मागे धावत आहेस.”
या कथेचा तात्पर्य: जर आपण भविष्यातील उद्दिष्ट्ये प्राप्त करू शकलो, तरच आपण आनंदी होणार आहोत, असा गैरसमज करून बहुतेक लोक स्वत:लाच फसवत असतात.
9. चुका स्वीकारा, पण खुबीने. – शोर्ट मराठी कथा
डॉ. सॅम्युअल जॉन्सन यांनी एक नवा शब्दकोश प्रसिद्ध केला होता. ज्याचं स्वागत जनतेकडून तसेच समीक्षकांकडूनही अत्यंत चांगलं झालं. त्या प्रकाशनाचं यश साजरे करण्यासाठी त्यांनी डॉ. सॅम्यूल जॉन्सन यांच्या सन्मानार्थ एक मेजवानी आयोजित केली.
मेजवानीच्या प्रसंगी प्रत्येकजण त्या शब्दकोशाची गुणवत्ता आणि त्यातील शब्दांचा समावेश यांची स्तुती करीत होता. डॉ. जॉन्सनही त्यांच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर उपस्थित असलेल्या सर्व लोकांवर छाप पाडत होते.
सगळेजण त्या शब्दकोशाची स्तुती करीत असताना, एका वयस्क स्त्रीने मध्येच त्यांना थांबवले आणि एवढ्या मोठ्या बुद्धीमान माणसाने एवढं प्रचंड बौद्धिक काम करूनही त्यात एक चूक कशी काय राहिली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.
मग तिने त्यांना विचारलं, “या न्यूनतेबद्दल तुम्ही काय म्हणाल?” उपस्थित असलेल्या प्रत्येकजण तिच्या या उद्धटपणामुळे आश्चर्यचकित झाला. जॉन्सन काय उत्तर देतात, याविषयी सगळेजण उत्सुक झाले.
डॉ. जॉन्सन थंडपणे म्हणाले, “अज्ञान, बाईसाहेब, शुद्ध अज्ञान! कृपया, मला क्षमा करा.”
या कथेचा तात्पर्य: डॉ. जॉन्सन यांचा नम्रणा वाखाणण्यासारखा आहे. श्रेष्ठ माणसाची पहिली परीक्षा म्हणजे नम्रता!
10. एक करोड रुपये देऊनही आपण एक सेकंद पण विकत घेऊ शकत नाही.
कोण एके काळी एका गावामध्ये एक कंजुष माणूस राहत होता, ज्याचं सारं आयुष्य हे पैसा गोळा करण्यातच गेले, आणि त्याने कधीही एक पैसा ही खर्च केला नाही.
त्याने जवळपास पाच लाख दिनार गोळा केले होते आणि उरलेलं आयुष्य अगदी विलासामध्ये जगण्याचं तो स्वप्न पाहत होता. पण असं काही होण्यापूर्वीच, यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी तिथं आले.
त्या कंजुष माणसाने त्याच्यासमोर हात पसरले, विनंती केली आणि पृथ्वीतलावर जास्त काळ राहायला मिळावं म्हणून आर्जवेही केली. “मला फक्त तीन दिवस द्या, मी तुम्हाला माझ्या संपत्तीतला अर्धा वाटा देतो.”
त्या दुतांनी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. “असं करा, फक्त एकच दिवस द्या. मी एवढं कष्ट करून मिळवलेलं सारं काही तुम्हाला देऊन टाकेन.” दूत अद्यापही तटस्थच होते.
मग, त्या माणसाने त्यांना विनंती केली की “पुढच्या पिढ्यांसाठी काही लिहून ठेवतो, काही सेकंद तरी थांबा.” दूतांनी त्याची ही इच्छा मात्र मान्य केली. त्या कंजुष माणसाने पुढचा मजकूर लिहून ठेवला.
“ज्याला कुणालाही हे मी लिहून ठेवलेले सापडेल, त्याच्यासाठी हे सांगणे आहे की, जर तुम्हाला चांगलं जगण्यापुरतं धन मिळालेलं असेल तर उरलेलं आयुष्य पुढे उगाच जमा करण्यासाठी वाया घालवू नका. जगाऽ! माझे पाच लाख दिनार माझ्या आयुष्यासाठी एक सेकंदही विकत घेऊ शकले नाहीत.”
ह्या कथेचा तात्पर्य: त्या कंजुषाने लिहून ठेवलेला मजकूर हाच मुळामध्ये या कथेचा तात्पर्य आहे. मृत्यू हा प्रत्येकासाठी अगदी अपरिहार्य आहे, त्यामुळे उगाचच धन जमा करण्यासाठी एक विशिष्ट मर्यादेपलिकडे जाण्यात काहीही उपयोग नाही.